BMC On Road-Potholes: मुंबईत लवकरच खड्डे मुक्त रस्ते! पालिका वापरणार भन्नाट आयडिया

याचपार्श्वभुमीवर पालिका एक भन्नाट आयडिया घेवून आली आहे. आता नव तंत्रज्ञान वापरून रस्त्याची दुरुस्ती करणार आहे.

BMC- road-potholes-(PHOTO Credit- ANI)

BMC On Road-Potholes: मुंबईत मुसळधार पावसाने रस्त्यांवर पाणी साचले जाते. यामुळे नागरिकांना चांगल्या परिणाम भोगावे लागते. सर्व सामान्य जनता ह्या साचलेल्या पाण्यामुळे त्रस्त होते. पावसाळात मुंबईतील रस्त्यावर चालायचे म्हणजे नाकेनऊच येते. यासंदर्भात पालिकां कित्येकदा सांगूनही काही फरक पडत नाही. रस्त्यांवरिल खड्यांमुळे नागरिक आणि पालिका दोघेही त्रस्तमुक्त कधी होणार असा प्रश्न नेहमी पडत असतो. अखेर आता खड्डे बुजवण्यासाठी पालिका आधुनिक तंत्राचा वापर करणार असल्याचे समोर आले आहे.

हे खड्डे बुजवण्यासाठी  रिअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅस्फाल्ट वापर करण्यात येणार आहे. मुंबईत पहिल्यांद हे आधुनिक तंत्र वापरण्यात येणार असल्याचे बीएमसी उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.  रिअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅस्फाल्ट वापरल्यानंतर रस्ते दोन तासानंतर लगेच खुले केले जाईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

रिअ‍ॅक्टिव्ह डांबर वापरून रस्ता सुरळीत व्हावा याकरिता हे नव तंत्रज्ञान वापरण्यात येईल. खड्डेमुक्त रस्ते लवकरच मुंबई करण्यासाठी हा प्रकल्प पुर्ण होईल अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. बीएससीच्या रस्ते विभागाने हे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पात मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील काही रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी याचा वापर करण्यात आला.