BMC New Home Quarantine Rules: होम क्वारंटीन असणार्‍या 5 वेळा फोन कॉल ते प्रत्यक्ष भेट, अशी असेल बीएमसी ची नियमावली

सध्या केंद्र सरकारने जारी केलेल्या 12 अ‍ॅट रिस्क देशांमधून येणार्‍या प्रवाशांसाठी ही नियमावली असणार आहे.

Home Quarantine | PC: Pixabay.com

ओमिक्रॉनची दहशत (Omicron  Scare) पाहता आता मुंबई महानगर पालिका (BMC) देखील अलर्ट मोड वर येऊन पुन्हा कामाला लागली आहे. नुकत्याच जारी केलेल्या नव्या होम क्वारंटीनच्या नियमावलीनुसार, दिवसाला 5 वेळा फोन कॉल ते फिजिकल भेट असे नवे नियम आता जारी झाले आहेत. सध्या केंद्र सरकारने जारी केलेल्या 12 अ‍ॅट रिस्क देशांमधून येणार्‍या प्रवाशांसाठी ही नियमावली असणार आहे. कोविड निगेटिव्ह असले तरीही मुंबईत उतरल्यानंतर त्यांना होम क्वारंटीन (Home Quarantine)  बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान होम क्वारंटीन असणार्‍या नागरिकांसाठी त्यांच्या हाऊसिंग सोसायटीला देखील त्यांच्याकडून क्वारंटीन नॉर्म्स पाळले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्याबाबत पत्र पाठवण्याचा मुंबई महानगरपालिका विचारात आहे. जर प्रवाशाकडून नियमभंग झाल्यास त्याच्यावर Disaster Management Act, 2005, and Epidemic Act, 1897 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सविस्तर नियमावली 3 डिसेंबर दिवशी जारी केली आहे. याद्वारा परदेशातून येणार्‍या व्यक्तींच्या आरोग्यावर ट्रॅक ठेवला जाणार आहे.

बीएमसीची ही नवी नियमावली कर्नाटकामध्ये 2 जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आल्यानंतर जारी करण्यात आली आहे. कर्नाटकातून आता हा धोका मुंबई मध्ये पसरू नये म्हणून मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ही पावलं उचलली आहेत.

बीएमसीच्या माहितीनुसार आता प्रत्येक दिवशी Mumbai International Airport Limited कडून मागील 15 दिवसांत ‘at risk’ आणि ‘high risk’देशातून येणार्‍या प्रवाशांची माहिती दिली जाणार आहे. Disaster Management Cell ही लिस्ट मुंबईत कार्यान्वित करण्यात आलेल्या 24 वॉर्ड निहात वॉर रूमला देणार आहे. पुढे वॉर रूम कडून ट्रॅकिंग, टेस्ट आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाणार आहे. हे देखील वाचा: Omicron: महापालिकेकडून प्रभावित देशातून येणाऱ्या नागरिकांसाठी Action Plan तयार केला जात असल्याची महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती .

वॉर रूम स्टाफ कडून होम क्वारंटीन असणार्‍यांना दिवसातून 5 वेळेस फोन करणार आहेत. त्यांना लक्षणांची माहिती विचारणार आहे तसेच पुढील 7 दिवस घरीच राहण्याचा सल्ला देतील. प्रोटोकॉल पाळला जात आहे की नाही हे पाहण्यासाठी भेट देखील दिली जाईल. जर सोसायटी मधील कुणाला संबंधित व्यक्ती नियम पाळत नसल्याचं आढळल्यास त्यांनी वॉर रूमला कळवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. होम क्वारंटीन असलेल्या व्यक्तींच्या घरी देखील कुणाला भेटायला न पाठवायचं आवाहन पालिकेकडून सोसायटीला करण्यात आलं आहे.

सातव्या दिवशी होम क्वारंटीन असणार्‍या व्यक्तीला आरटीपीसीआर टेस्ट करावी लागेल. जर टेस्ट पॉझिटिव्ह आली किंवा लक्षणं असल्यास पालिकेच्या केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे.