BMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक

त्यामुळे आता या निवडणुकीत कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय पक्ष जुन्याच चेहऱ्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्यांची निवडण करणाय याबाब उत्सुकता आहे.

Brihanmumbai Municipal Corporation (Photo Credits: PTI)

मुंबई महापालिका स्थायी समिती (BMC Standing Committee) आणि त्यासोबतच इतरही काही वैधानिक समित्यामध्ये असलेल्या रिक्त जागांवर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता या समित्यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. प्राप्त माहितीनुसार, बीएमसीच्या स्थायी समिती, शिक्षण समिती (BMC Education Committee) , सुधार समिती (BMC Reforms Committee,) आणि बेस्ट समिती ( BMC Best Committee ) सदस्यांची नावे जाहीर झाली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेच्या सभेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही नावे जाहीर केली. या समित्यांमध्ये कोणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता होती. या समित्यांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी चर्चा असतानाच अपवाद आणि किरकोळ बदल वगळता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा कोणत्याच पक्षाकडून विशेष काही फेरबदल घडले नाहीत.

विविध समित्यांमधील नवनियुक्त सदस्य (पक्षनिहाय)

स्थायी समिती
पक्षाचे नाव नियुक्त सदस्याचे नाव
शिवसेना विश्वनाथ महाडेश्वर, राजुल पटेल, विशाखा राऊत, (सुजाता सानपच्या रिक्त जागी)
भाजप उज्ज्वला मोडक, आशा मराठे, भालचंद्र शिरसाट, हरिश भांदिर्गे, कमलेश यादव, मकरंद नार्वेकर, राजेश्री शिरवडकर, विद्यार्थी सिंग
काँग्रेस रवी राजा

 

राष्ट्रवादी काँग्रेस राखी जाधव

शिक्षण समिती
पक्षाचे नाव नियुक्त सदस्यांची नावे
शिवसेना स्नेहल आंबेकर, शुभदा गुढेकर, संध्या दोषी, मंगेश सातमकर, राहुल कनाल (बिगर सदस्य)
भाजप योगिता कोळी, श्रीकला पिल्ले, नेहल शाह, प्रतिक कर्पे (बिगर सदस्य)
काँग्रेस संगिता हंडोरे, विन्निफ्रेड डिसोझा
राष्ट्रवादी काँग्रेस डॉ. सईदा खान

(हेही वाचा, Mumbai HC Dismisses BJP Petition: रिकाम्या हाताने परतली भाजपा, मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते पद काँग्रेसडेच, मुंबई उच्च न्यायालयाने फेटळली याचिका, पाहा काय सांगतो कायदा)

सुधार समिती
पक्षाचे नाव नियुक्त सदस्यांची नावे
शिवसेना समृध्दी काते, श्रध्दा जाधव, अनंत नर, राजू पेडणेकर, श्रीकांत शेट्ये, चित्रा सांगळे
भाजप सुनिल यादव, विनोद मिश्रा, सागरसिंह ठाकूर, हरिष छेडा
काँग्रेस कमरजहाँ सिद्दीकी
राष्ट्रवादी काँग्रेस मनिषा रहाटे
समाजवादी पक्ष रुक्साना सिद्दीकी

बेस्ट समिती
शिवसेना आशिष चेंबूरकर,अनिल कोकिळ,अनिल पाटणकर
भाजप गणेश खणकर, अरविंद कागिनकर, राजेश हाटले
काँग्रेस रवी राजा

येत्या 5 ऑक्टोबरला अध्यक्ष पदाच्या निवडणुका

दरम्यान, वरील समित्यांमध्ये असलेल्या रिक्त जागांवर विविध सदस्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे या समित्यांच्या जागा भरल्या गेल्या. दरम्यान, आता येत्या 5 ऑक्टोबरला या सर्व समित्यांच्या अध्यक्षपदांची निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय पक्ष जुन्याच चेहऱ्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्यांची निवडण करणाय याबाब उत्सुकता आहे.