BMC Recruitment 2021: मुंबई महापालिकेत मेगा भरती; 2000 हून अधिक रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची 'ही' आहे अंतिम तारीख
एकूण 1850 ते 2070 रिक्त जागा असून पात्र उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे.
कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया?
1. वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटेस्टिव्हिस्ट अटेस्टंट नेफ्रोलॉजिस्ट, ओलॉजिस्टन, न्यूरोलॉजिस्ट या पदांसाठी एकूण 50-70 जागा रिक्त आहेत.
2. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS< BHMS या पदांसाठी 900-1000 जागा आहेत.
3. प्रशिक्षित अधिपरिचारिका पदासाठी 900-1000 जागा निघाल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता:
पद क्रमांक 1:
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक असणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल किंवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत असावा.
पद क्रमांक 2:
मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक असणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल किंवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (आयुर्वेद व होमिओपविक) नोंदणीकृत असावा.
पद क्रमांक 3:
जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा पदवीधारक असणे गरजेचे आहे.
योग्य नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असावा.
वयोमर्यादा:
9 जून 2021 पर्यंत उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 33 वर्षांपेक्षा अधिक असू नये.
वेतन:
वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार- दीड लाख ते 2 लाख.
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी- 50 ते 80 हजार.
प्रशिक्षित अधिपरिचारिका- 30 हजार.
दरम्यान, portal.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला यासंदर्भात अधिक माहिती मिळेल.