Bmc New Notice To Narayan Rane: नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची नोटीस, 'बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवा अन्यथा कारवाई करु'

मुंबई (Mumbai ) येथील जुहू (Juhu) परिसरात असलेल्या 'अधीश' (Adhish Bungalow) बंगल्यातील बेकायदा बांधकाम (Unauthorized Construction Case) प्रकरणात मुंबई पोलिकेने राणे यांना पाठवलेली ही तिसरी नोटीस आहे.

Narayan Rane (Photo Credit- Credit - Twitter)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई महापालिकेने (BMC) पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. मुंबई (Mumbai ) येथील जुहू (Juhu) परिसरात असलेल्या 'अधीश' (Adhish Bungalow) बंगल्यातील बेकायदा बांधकाम (Unauthorized Construction Case) प्रकरणात मुंबई पोलिकेने राणे यांना पाठवलेली ही तिसरी नोटीस आहे. मुंबई पालिकेने ही अंतिम नोटीस आहे. त्यामुळे नोटीशीनुसार जर आपण स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर पालिका कारवाई करेल असे या नोटीशीमध्ये नमुद करण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांमध्ये हे बांधकाम हटविण्याबाबत महापालेकेने म्हटले आहे. महापालिकेने राणे यांना ही नोटीस शुक्रवारी पाठवली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राणे यांनी बंगल्याच्या सर्व्हिस एरिया आणि पार्किंग भागात बांधकाम करुन खोल्या बांधल्या आहेत. पहिल्या आणि तिसऱ्या मजल्याच्या उद्यानात खोली बांधली आहे. चौथ्या मजल्यावर गच्चीवर बांधकाम केले आहे. पाचव्या मजल्यावरील गार्डन टेरेसवर खोली आहे. शिवाय सहाव्या मजल्यावर पार्ट टेरेसमध्ये खोलीचे बांधकाम आहे. आठव्या मजल्यावरही पॉकेट टेरेसवर गार्डन टेरेसमध्ये बांधकाम करण्यात आले आहे. गच्चीतील पॅसेज भागात बांधकाम करण्यात आले आहे. (हेही वाचा, Narayan Rane’s Security: मंत्री नारायण राणे यांना केंद्रीय गृह खात्याकडून ‘Z’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था)

दरम्यान, नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुले नितेश आणि निलेश यांनी पाठिमागील काही काळापासून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राणे यांना अटकही झाली होती. पुढे त्यांनी जामीन मिळवला. दुसऱ्या बाजूला शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना अटक झाली होती. त्यांनाही पुढे याच प्रकरणात जामीन मिळाला. निलेश राणे यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे राणे पितापुत्र विरुद्ध महाविकासाघाडी सरकार असा सामना सध्या पाहायला मिळतो आहे.