BMC Executive Assistant Recruitment 2024: बीएमसी मध्ये कार्यकारी सहायक पदासाठी 1846 जागांवर होणार नोकरभरती; portal.mcgm.gov.in वर अर्ज प्रक्रिया सुरू
बीएमसी मध्ये कार्यकारी सहायक पदाच्या या भरतीसाठी 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या दरम्यान केवळ ऑनलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांकरिता नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बीएमसी मध्ये क्लेरिकल केडर अर्थात पूर्वी लिपिक आणि आता कार्यकारी सहायक (Executive Assistant) म्हणून ओळखल्या जाणार्या पदासाठी ही नोकरभरती होणार आहे. बीएमसी (BMC) च्या जारी नोटिफिकेशन मध्ये एकूण 1846 जागांसाठी ही नोकरभरती होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 20 ऑगस्ट 2024 पासून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन माध्यमातून बीएमसीच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवार आपला अर्ज दाखल करू शकणार आहेत. कार्यकारी सहायक पदासाठी 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.59 मिनिटे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
बीएमसी मध्ये कार्यकारी सहायक पदासाठी कसा कराल ऑनलाईन अर्ज?
- बीएमसीचं अधिकृत संकेतस्थळ portal.mcgm.gov.in वरून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
- BMC च्या वेबसाईटवर Recruitment मध्ये Chief Personnel Officer>Executive Assistant(Previous Designation: Clerk) Recruitment Advertise-2024 शोधा
- त्यानंतर जाहिरात संपूर्ण वाचून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
- आवश्यक माहिती भरा आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- त्यानंतर अॅप्लिकेशन फी भरून तुमचा अर्ज दाखल करा.
दरम्यान बीएमसी मधील या नोकरभरतीसाठी 200 गुणांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेची तारीख पुढे जाहीर केली जाईल. इथे पहा बीएमसीचं अधिकृत नोटिफिकेशन.
कार्यकारी सहायक पदाच्या नोकरभरतीचे तपशील
कार्यकारी सहायक पद हे 'क' गटातील पद आहे. वेतन श्रेणी मध्ये M 15 असून 25,500 ते 81,100 आहे. बीएमसीच्या नोकरप्रक्रियेमध्ये SC, ST, OBC, EWS,आणि अन्य प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आले आहे. यामध्ये वतोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे. खुला वर्ग साठी वयोमर्यादा 18-34 वर्ष आहे तर आरक्षित वर्गासाठी 18-43 वर्ष आहे. या नोकरभरतीच्या प्रक्रियेमध्ये केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार असल्याने या प्रक्रियेसाठी वैध इमेल आयडी असणं आवश्यक आहे.