BMC Shuts Down 40 Illegal Schools: राज्य सरकारच्या आदेशानंतर बीएमसीने बंद केल्या 40 बेकायदेशीर शाळा
अहवालानुसार, आणि बीएमसीने सर्व नियमांची पूर्तता करणार्या जवळपासच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
BMC Shuts Down 40 Illegal Schools: राज्य सरकारच्या आदेशानंतर बीएमसीने (BMC) मुंबईतील (Mumbai) सुमारे 40 बेकायदेशीर शाळा ( Illegal Schools) बंद केल्या आहेत. बीएमसीने राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करून शहरातील सर्व 210 बेकायदेशीर शाळा वर्ष सुरू होण्यापूर्वी बंद करण्याचे निर्देश दिले होते आणि तसे न केल्यास शहरातील उर्वरित 170 बेकायदेशीर संस्थांच्या मालकांविरुद्ध एफआयआर नोंदवता येईल, असे सांगितले आहे.
शाळांचे क्षेत्रफळ 5,000 चौरस फूट, 20 लाख रुपये सुरक्षा ठेव आणि 30 वर्षांचा जमिनीचा करार असावा, असा सरकारी नियमांचा आदेश आहे. या आवश्यकतांची पूर्तता न करणाऱ्या शाळांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून मे महिन्यात महाराष्ट्रातील सर्व स्थानिक महामंडळांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातील बेकायदा शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आवश्यक असल्यास अशा शाळा मालकांविरुद्ध एफआयआर नोंदवावेत, असेही आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा - Sharad Pawar On Ajit Pawar: 'ना थकलो आहे न निवृत्त झालोय'; अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाक्याचा पुनरुच्चार करत शरद पवारांनी दिलं अजित पवारांना दिलं उत्तर)
बीएमसीने विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, कुर्ला, मालाड आणि कांदिवलीमध्ये तब्बल 80 बेकायदा शाळा आहेत. तथापि, चर्चगेट, कुलाबा, भायखळा, माझगाव, प्रभादेवी, खार आणि वरळी येथे कोणत्याही बेकायदेशीर शाळा नाहीत. अहवालानुसार, आणि बीएमसीने सर्व नियमांची पूर्तता करणार्या जवळपासच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक बेकायदेशीर शाळांना मुंबईत नियम पूर्ण करणे शक्य नाही, असे म्हणत कारवाईतून सूट मागत आहेत.