BMC Budget 2023: मुंबई महानगर पालिकेचा 52,619 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर
यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 14.52% वाढ करण्यात आली आहे. 2022-23 चा अर्थसंकल्प 45,950 कोटी रूपयांचा होता.
मुंबई महानगर पालिका (BMC) कडून आज 4 फेब्रुवारी 2023 दिवशी 2023-24 चे अर्थसंकल्पिय अंदाज सादरीकरण करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि सध्या प्रशासक म्हणून पालिकेचं कामकाज सांभाळणारे डॉ. इक्बाल सिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal) यांनी पालिकेचा मुख्य अर्थसंकल्प आणि शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये पालिकेचा आजचा अर्थसंकल्प 52,619 कोटी रूपयांचा आहे. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 14.52% वाढ करण्यात आली आहे. 2022-23 चा अर्थसंकल्प 45,950 कोटी रूपयांचा होता.
मुंबईकरांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातील दिलासादायक बाब म्हणजे बजेट मध्ये कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त कर किंवा करात वाढ करण्यात आलेली नाही. 2022 - 23 या आर्थिक वर्षात, मालमत्ता करातून उत्पन्नाचा दुसरा सर्वोच्च स्त्रोत 7000 कोटी रुपयांचा अंदाज होता. जो 2200 ने कमी करून 4800 कोटी झाला आहे. अशी माहिती इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. बीएमसीने सांगितले की डीपी विभागाकडून 4,400 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे, तर मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न 6,000 कोटी रुपये अपेक्षित आहे.
बीएमसीला गुंतवणुकीवर रु. 1707 कोटी व्याज मिळण्याची अपेक्षा आहे. पाणी शुल्क आणि सांडपाणी यातून Rs 1965 महसूल मिळणे अपेक्षित आहे. 64 कोटी आणि जकातीच्या बदल्यात शासनाकडून अनुदान 12344.10 कोटी अपेक्षित आहे. बेस्ट उपक्रमाला 800 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचे प्रस्तावित केले आहे. प्राथमिक शिक्षण साठी 3348 कोटी रुपये प्रस्तावित आहेत.
मुंबई शहरातील प्रदुषण हा चर्चेचा विषय आहे. बीएमसीने मुंबई मध्ये 5 ठिकाणी एअर प्युरिफायर बसवण्याचे प्रस्तावित केले आहे. यामध्ये दहिसर टोल नाका, मुलूंड चेक नाका, मानखुर्द, कलानगर, हाजी अली जंक्शन येथे हे एअर प्युरिफायर बसवले जाणार आहेत. मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट कोस्टल रोडसाठी 3545 कोटी प्रस्तावित आहेत.
मुंबई महानगर पालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सार्वजनिक ठिकाणी नव्याने चार्जिंग स्टेशन सुरू करणं प्रस्तावित आहे.