BMC Budget 2021-22: मुंबई महानगर पालिकेचं आत्तापर्यंत सर्वाधिक 39038 कोटींचं बजेट जाहीर; पहा काय आहेत तरतुदी
यावेळेस त्यांनी यंदाच्या बजेटामध्ये 16.74% वाढ करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
मुंबई महानगर पालिकेने यंदा 2021-22 चा अर्थसंकल्प (BMC Budget 2021-22) मांडला आहे. यंदाचं हे बजेट आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 39,038 कोटी रूपयांचं बजेट मांडण्यात आले आहे. मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (I S Chahal) यांनी आज स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये मांडलं आहे. यावेळेस त्यांनी यंदाच्या बजेटामध्ये 16.74% वाढ करण्यात आल्याचं सांगितलं आहे. तसेच कोणतेही नवे कर आकारण्यात आलेले नाहीत. (हेही वाचा, BMC Budget 2021: शिक्षण समितीचंं बजेट सादर; मुंबई महापालिकेच्या शाळा मुंबई पब्लिक स्कूल म्हणून ओळखल्या जाणार).
दरम्यान आजच्या मुंबई महानगरपालिका अर्थ संकल्पामध्ये माहिती देताना चहल यांनी कोरोना संकटाचा बीएमसीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचं म्हटलं आहे. यंदा 5876 कोटींनी बीएमसीचं उत्पन्न घटलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान यावेळेस बीएमसीच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रोजेक्ट साठी 2 कोटी तर गोरेगाव- मुलुंड लिंक रोड साठी 1300 कोटी प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. BMC Budget 2021: सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून सॅनिटायझर प्यायले; मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करतानाची घटना.
BMC Budget 2021-22
बीएमसीने आरोग्य विभागासाठी 4728 कोटींचं बजेट ठेवल्याची माहिती आहे. कोरोना संकटामुळे इतर गोष्टींवरून आता आरोग्य क्षेत्राला प्राधान्य दिले जात आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. 'विविध सेवाशुल्कात सुधारणा करणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबईत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ असेल अशी देखील माहिती देण्यात आली आहे. तर 2034 पर्यंत शहराच्या डेव्हल्पमेंट प्लॅन साठी बीएमसीने 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये 5947.68 कोटींची विशेष तरतूद केली आहे. तर आजच्या बजेट मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने एमआरआयडीसीएल मार्फत 1675 कोटी रूपये इतक्या अंदाजित खर्चाची 12 पुलांची कामे हाती घेण्याचं ठरवलं आहे.