BMC Budget 2021: सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून सॅनिटायझर प्यायले; मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करतानाची घटना

परंतू, महापालिका सहआयुक्तांकडून नजरचूक अशी झाली की त्यांनी पाण्याची बॉलट समजून सॅनिटायजरची बॉटल उचलली आणि चक्क ती तोंडाला लावली. उपस्थितांनी ते सॅनिटायझर प्यायल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले.

BMC Budget 2021 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिका अर्थसंकल्प आज सभागृहात सादर करण्यात आला. अर्थसंकल्प सादर करताना बीएमसी महापालिका सहआयुक्त रमेश पवार (Joint Commissioner Ramesh Pawar) यांच्याबाबत एक भलतीच विचित्र घटना घडली. रमेश पवार यांनी चक्क पाणी म्हणून सॅनिटायझर (Sanitizer) प्राशन केले आणि सभागृहात एकच धांदल उडाली. महापालिकेचे शिक्षण बजेट (BMC Budget) मांडलं जात असताना ही घटना घडली. काय घडले असे? ज्यामुळे सहआयुक्तांनी सॅनिटायझर प्राशन केले? घ्या जाणून. घडल्या प्रकाराची महापालिका कार्यालय आणि आवारात भलतीच चर्चा सुरु होती.

कोरोना व्हायरस प्रादुर्भाव कमी आला असला तरी त्याचे पूर्ण उच्चाटन झाले नाही. त्यामुळे अद्यापही मोठी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करतेवेळी पालिका प्रशासनानेही खबरदारी घेतली. महापालिका अधिकाऱ्यांच्या टेबलवर पाणी बॉटल आणि त्यासोबतच सॅनिटायझर बॉटलही ठेवली. परंतू, महापालिका सहआयुक्तांकडून नजरचूक अशी झाली की त्यांनी पाण्याची बॉलट समजून सॅनिटायजरची बॉटल उचलली आणि चक्क ती तोंडाला लावली. उपस्थितांनी ते सॅनिटायझर प्यायल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. मग सहआयुक्त काही वेळासाठी सभागृहाबाहेर गेले आणि पुन्हासभागृहात परतले. (हेही वाचा, BMC Budget 2021: शिक्षण समितीचंं बजेट सादर; मुंबई महापालिकेच्या शाळा मुंबई पब्लिक स्कूल म्हणून ओळखल्या जाणार)

अशाच प्रकारची घटना नुकतीच यवतमाळ जिल्ह्यात घडली. येथे पोलिओ लसीकरण मोहिमेवेळी एका चिमूकल्यास चक्क पोलीओ लस देण्याऐवजी चक्क सॅनिटायझर देण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य कंद्र कक्षेत येणाऱ्या कोपरी येथे ही संतापजनक घटना घडली. सॅनिटायझर पाजल्यामुळे येथील 12 बालकांची प्रकृती बिघडली. त्यांना यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी आणि दोन कर्मचारी निलंबित झाले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत नुकताच जाहीर केला. या अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका करत 'अर्थसंकल्प हा देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नाही' असे म्हटले होते. त्यामुळे गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिका अर्थसंकल्पात सर्वसामान्य मुंबईकरांसोबतच इतर घटकांना काय मिळते याबाबत उत्सुकता आहे.