BMC New Guidelines For Construction Sites: वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज, बांधकाम साईट्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
हे प्रदुषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) सज्ज झाली आहे. त्यासाठी पालिकेने वायू प्रदूषण रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत.
Mumbai Air Pollution: मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर ढासळत आहे. हे प्रदुषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) सज्ज झाली आहे. त्यासाठी पालिकेने वायू प्रदूषण रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत. या उपाययोजनांच्या माध्यमातून हवेच्या गुणवत्तेवर बांधकामांचा प्रभाव कमी करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे (BMC New Guidelines For Construction Sites) जारी करण्यात आली आहेत. बीएमसीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अनेक प्रमुख उपायांचा समावेश आहे. ज्याची अंमलबजावणी करण्यासाठी बांधकाम साइट्सने वायू प्रदूषणात त्यांचे योगदान कमी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत अलीकडेच घसरण होत असल्याने उद्भवलेल्या समस्या कमी करण्यासाठी सक्रिय बीएमसीने पावले उचलली आहेत.
BMC द्वारा जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे:
- 70 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिमितीभोवती 35 फूट उंच टिन/मेटल शीट उभारणे.
- सर्व बांधकामाधीन इमारतींना हिरवे कापड, ज्यूट शीट किंवा ताडपत्री चारही बाजूंनी बंदिस्त करणे अनिवार्य
- बांधकामादरम्यानस धूळ उडत असल्यास सतत पाणी शिंपडणे किंवा फवारणी करणे.
- बांधकामादरम्यान हिरवे कापड, ज्यूट शीट किंवा ताडपत्रीने अच्छादन नसलेल्या इमारतींचे काम तातडीने थांबविण्याचे आदेश
- प्लॉट/साइट भागात स्प्रिंकलर सिस्टीम असणे अनिवार्य
- बांधकामादरम्यान दिवसभर धूळ उडणार नाही याची नियमित काळजी घेणे
- मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी बीएमसीची विशेष अंमलबजावणी पथके तैनात
दरम्यान, नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, BMC ने विशेष अंमलबजावणी पथके स्थापन केली आहेत. ही पथके बांधकाम स्थळांवर लक्ष ठेवतील. कामाचे व्हिडिओ पुरावे मिळवतील. पालन न केल्यास, BMC काम थांबवण्याच्या नोटिसा जारी करणे किंवा बांधकाम साइट सील करणे यासारख्या कठोर कारवाई करेल. पाठिमागील काही दिवसांपासून मुंबईत हवेची गुणवत्ता कमालीची घसरत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कारवाईचा निर्णय घेतला आहे.
रस्त्यावरील धुळीचा सामना करण्यासाठी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, BMC अँटी स्मॉग मशीन सक्रिय करण्याची योजना आखत आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येक बांधकाम साइटवर स्वतंत्र हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मापन प्रणाली स्थापित केली जावी अशी अट घालण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. बीएमसीच्या 20 ऑक्टोबरच्या निवेदनात बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ढिगारा हवेतून बाहेर पडू नये म्हणून पूर्णपणे झाकून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बीएमसीने सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवत हवामान बदलाविषयीच्या वाढत्या चिंतेशी आणि त्याचा मुंबई महानगर क्षेत्रातील हवेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम विचारात घेऊन ही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.