दादर मध्ये सुरू झालं देशातलं पहिलं डिजिटलाईज्ड Valet Parking; पहा कशी आहे सुविधा!
ही बुथ नियमित 11 तास सुरू राहणार आहेत.
मुंबईचं हार्ट समजलं जाणार्या दादर मध्ये शॉपिंग साठी अनेक जण दुरून दुरून येतात. पण दादर हा कायमच गर्दीचा भाग असल्याने इथे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. अनेकदा दुचाकी, चारचाकींमा पार्किंग मिळत नाही. पण आता हीच समस्या दूर होणार आहे. बीएमसी, पोलिस आणि दादर व्यापारी संघ यांनी मिळून या समस्येवर तोडगा काढला आहे. देशातलं पहिलं डिजिटलाईज्ड valet parking दादर मध्ये सुरू करण्यात आलं आहे.
वाहक त्यांची वाहनं नेमून दिलेल्या केंद्रांवर सोडणार आहेत. त्यानंतर तेथील कर्मचारी तुमची गाडी कोहिनूर पब्लिक पार्किंग लॉट मध्ये पार्क करणार आहेत. सध्या या सुविधेमध्ये पहिलं पार्किंग केंद्र प्लाझा सिनेमागृह परिसरामध्ये सुरू करण्यात आलं आहे. सुरूवातीच्या 4 तासांसाठी 100 रूपये आकारले जाणार आहेत. त्यावर लागणार्या वेळेसाठी 25 रूपये अधिक प्रतितास मोजावे लागणार आहेत.
Park+ या स्टार्टअप कडून ही खास सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ही बुथ नियमित 11 तास सुरू राहणार आहेत. ही डिजिटलाईज्ड व्हेले पार्किंग सेवा दादर मध्ये अजून चार ठिकाणी सुरू केली जाणार आहेत.
दादर मध्ये शॉपिंग प्रमाणेच मोठ्या प्रमाणात कामासाठी, देवळांमध्ये, लोकं येतात. इथे नाट्यगृहं आणि सिनेमागृहांमध्येही नागरिक मोठ्या प्रमाणात येतात.