Mumbai Water Cut: पंजरापूर प्लांटमध्ये तांत्रिक समस्या; बीएमसीकडून मुंबई शहरातील काही भागांसह सर्व पश्चिम उपनगरांमध्ये पाणीकपात जाहीर (Check Affected Areas)
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रस होणारा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. परिणामी मुंबई शहरातील काही भाग आणि सर्व उपनगरांमधील पाणीपुरवठा पुढील 24 तासांसाठी 20 टक्क्यांनी कमी करण्यात येणार (Water Crisis Mumbai) असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.
Water Cut News in Mumbai: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रस होणारा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. परिणामी मुंबई शहरातील काही भाग आणि सर्व उपनगरांमधील पाणीपुरवठा पुढील 24 तासांसाठी 20 टक्क्यांनी कमी करण्यात येणार (Water Crisis Mumbai) असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे. बीएमसीने आपल्या एक्स हँडलद्वारे दिलेल्या माहितीनुसार पडघा येथील 100 केव्ही वीज उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सोमवारी (6 मे) रोजी सकाळी 10 वाजणेच्या सुमारास अचानक खंडीत झाला. त्यामुळे जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडली. परिणामी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
पर्यायी वीजपुरवठा सुरु
वीजपुरवठा पुर्ववत होण्यासाठी आणि शहरातील जलकपातीची समस्या निवारणासाठी मुंबई महापालिका युद्धपातळीवर कार्यरत आहेत. महापालिकेने वीज पारेषण कंपनीशी समन्वय साधून सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुसऱ्या बाजुने पर्यायी वीजपुरवठा सुरु करण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी पाणीपुरवठा पूर्ववत वेगाने सुरु होण्यास काही अवधी द्यावा लागणार असल्याचे महापालिकेने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, Severe Water Crisis: सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे गंभीर संकट; 15 दिवसांत एकदा टँकरने पाणीपुरवठा, प्रत्येक थेंबासाठी तळमळत आहेत लोक (Video))
बीएमसी पाणीकपात प्रभावीत परिसर
पालिकेने एक्स हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, पांजरापूर केंद्रातील सर्व पंप टप्प्या-टप्प्याने कार्यान्वित केल्यानंतर सर्वप्रथम संतुलन जलाशये व सेवा जलाशयांमधील जलसाठा पातळी पूर्ववत करणे, जलवाहिन्या योग्य दाबाने भारीत करणे (चार्जिंग) या प्रक्रियेला काही अवधी लागणार आहे. या सर्व तांत्रिक कारणांमुळे मुंबई-१ या मुख्य जलवाहिनीद्वारे संपूर्ण पश्चिम उपनगरे, तसेच शहर विभागातील जी दक्षिण, जी उत्तर, ए विभाग आदी परिसरांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पुढील 24 तासांसाठी 10 टक्के पाणीकपात करावी लागणार आहे. दरम्यान, मुंबई-२ या मुख्य जलवाहिनीद्वारे संपूर्ण पूर्व उपनगरे, तसेच शहर विभागातील एफ उत्तर, एफ दक्षिण, ई तसेच बी विभागातील काही परिसरांमध्ये पुढील 24 तासांसाठी 20 टक्के पाणीकपात होणार आहे. (हेही वाचा, Mumbai Water Cut: 9 ते 11 मार्च दरम्यान मुंबईतील 11 महापालिका प्रभागांमध्ये 48 तासांसाठी 10 टक्के पाणीपुरवठा कपात)
एक्स पोस्ट
बीएमसीकडून नागरिकांना अवाहन
दरम्यान, पाणीपुरवठा पूर्ववत वेगाने सुरु करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. लवकरच तो पूर्ववत केलाही जाईल. दरम्यान, नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच पाणी काटकसरीने वापरावे, असे अवाहन पालिकेने आपल्या निवेदनात केले आहे. आवश्यक तेवढ्या पाण्याचा साठा नागरिकांनी करवा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असेही पालिकेच्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, उन्हाळ्याचे दिवस असल्याने मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी घरगुती पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. दुसऱ्या बाजूला धरणात मर्यादीत पाणीसाठा असल्याने पालिकेला पाण्याचे वितरण करताना अनेक बाबींची काळजी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि पालिका यांच्यात समन्वयाने काम करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)