Blood Bank In Mumbai: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! पुढील 5-6 दिवसांसाठी रक्तपुरवठा शिल्लक

तर कोरोनाच्या महासंकटामुळे आरोग्य विभागावर मोठा ताण पडल्याने प्रत्येक डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र रुग्णांवर उपचार करत आहेत.

Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

Blood Bank In Mumbai: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सर्वच सेवासुविधांची कोंडी झाल्याची पहायला मिळत आहे. तर कोरोनाच्या महासंकटामुळे आरोग्य विभागावर मोठा ताण पडल्याने प्रत्येक डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र रुग्णांवर उपचार करत आहेत. तसेच कोरोनाग्रस्तांसह अन्य आजारांसाठी उपचार घेण्याऱ्या रुग्णांना सुद्धा सद्यच्या घडीला काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईकरांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. ती अशी म्हणजे की मुंबईतील नागरिकांना पुढील 5-6 दिवस रक्तपुरवठा होईल ऐवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. याबद्दल एपीबी माझा यांनी माहिती दिली आहे.

यापूर्वी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. कोरोनाच्या काळात लागणारा रक्तचा पुरवठा पाहता नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन सहकार्य करण्याचे ही सांगण्यात आले होते. तर गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा राज्यातील विविध गणपती मंडळांनी रक्तदान शिबीर आयोजन केल्याचे दिसून आले. मात्र आता पुन्हा रक्ताची कमतरता भासण्याची शक्यता आहे.(CM Uddhav Thackeray Live Updates: मुंबई कार शेड, कृषी कायदा ते कोविड 19 ची परिस्थिती बद्दल पहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?)

मुंबईत शासनाच्या एकूण 17 रक्तपेढ्या आणि खासगी 10  पेढ्या आहेत. तर शहरातील किंवा जिह्यातील लोकसंख्येच्या 1 टक्के रक्ताचा साठा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. मात्र कोरोनाच्या काळात रक्तदानाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याच कारणास्तव आता प्रशासनाकडून सामाजिक संस्था आणि नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी केले आहे. त्याचसोबत सध्या नवरात्रीचे दिवस सुद्धा आता सुरु होणार असून या काळात सुद्धा रक्तदान शिबीरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.