पत्नी, धनप्राप्तीसाठी तरुणाला विवस्त्र करुन पूजा; नंदूरबारमध्ये जादूटोणा

परंतू, एका पीडित तरुणाने आरोपींनी आपल्याला विवस्त्र करुन पूजा केल्याचे घरी सांगितले आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.

पैसे आणि चांगल्या बायकोसाठी अघोरी पूजा (प्रतिकात्मक आणि संग्रहीत प्रतिमा)

लोक कशासाठी काय करतील आणि कोणत्या स्तराला जातील याचा काही नेम नाही. नंदूरबारमध्ये चक्क चांगली पत्नी मिळावी यासाठी तरुणाला विवस्त्र करुन पुजा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रथमदर्शनी हा जादुटोण्यातला प्रकार असावा असा अंदाज आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, एक आरोपी आणि एका पुजाऱ्यालाही अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पैशाचा हव्यास आणि चांगली बायको या कारणासाठी हा प्रकार करण्यात आला. आरोपींनी ही अघोरी पूजा केली. मात्र, या पूजेमध्ये परिसरातील इतर तरुणांनीही सहभागी व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले. समाजाच्या डोळ्यात येऊ नये यासाठी हा सर्व प्रकार गुपचूप सुरु होता. परंतू, एका पीडित तरुणाने आरोपींनी आपल्याला विवस्त्र करुन पूजा केल्याचे घरी सांगितले आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.

आरोपी हे नरबाळी देण्याच्या विचारात होते, असेही पुढे आले आहे. दरम्यान, नंदूरबार शहर पोलिसांनी जादूटोणा प्रतिंबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Santosh Deshmukh Murder Case: 'सर्व दोषींना कायद्यानुसार शिक्षा होईल, 'गुंडाराज' खपवून घेणार नाही'; सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर CM Devendra Fadnavis यांचे वक्त्यव्य

Urmila Kothare Car Accident: उर्मिला कोठारे च्या कारचा चालक पोलिसांच्या ताब्यात; जाणून घ्या कसा झाला अपघात?

Prajakta Mali कडून आमदार सुरेश धस यांच्या माफीनाम्यानंतर 'कायदेशीर कारवाई मागे घेत असल्याची' माहिती; महाराष्ट्राचे मानले आभार (Watch Video)

CM Pinarayi Vijayan On Nitesh Rane: नितेश राणे यांच्या ‘मिनी पाकिस्तान’ वक्तव्यावरुन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचेकडून निषेध