'अहंकारी वक्तव्यामुळेच भाजप महाराष्ट्रात अपयशी ठरली!' रोहित पवार यांच्याकडून आशिष शेलार यांच्यावर टीका
तसेच भाजपमधील नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा पक्षाला मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (Bhartiya Janta Party) सर्वाधिक जागा जिंकल्या असून त्यांना बहुमत सिद्ध करता न आल्याने त्यांना सत्तेपासून वंचित राहावे लागले होते. तसेच भाजपमधील नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा पक्षाला मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही विषयात हात घालत भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रात भाजपने एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकली नाही. भाजपमधील काही नेत्यांच्या अंहकारी वक्तव्यामुळेच भाजप महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरली आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तसेच इतरांवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रात काय केले पाहिजे? यावर त्यांनी बोलणे अपेक्षित आहे, असेही रोहित म्हणाले आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून सत्ताधारी पक्षावर वारंवार टिका केली जात आहे. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. तसेच महाविकास आघाडीचे सरकार विकासाच्या कामाला स्थगिती देत असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. यावरून रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाकडे गेल्या अनेक वर्षांपूर्वी केवळ दोनच खासदार होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अधिक कष्ट घेत गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त करून केंद्रात सरकार स्थापन केली आहे. परंतु, गेल्या विधानसभा निवडणुकीत अंहकारी वकव्यामुळेच भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. महाराष्ट्रात भारतीय पक्षावर ज्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ते केवळ आशा व्यक्तव्यामुळेच, असे बोलत रोहित पवार यांनी आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. इतरांवर टिका करण्यापेक्षा महाराष्ट्रात काय केले पाहिजे, यावर बोलणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी चांगले काम करत राहील. बोलत राहणे हे विरोधकांचे काम आहे, तर लोकांसाठी काम करत राहणे आमचे काम आहे. तसचे काम केल्यानेच यश मिळते, असेही रोहित पवार त्यावेळी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- दिल्ली हिंसाचारानंतर मुंबईत कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कलम 144 लागू; रॅली, आंदोलनावर 9 मार्चपर्यंत बंदी
ट्वीट-
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. परंतु, मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सरू झाली. त्यानंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करत असल्याची चर्चा सुरु झाली. त्यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेवर शाब्दीक हल्ला चढवला होता. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद चिघळतच गेला. अखेर शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी तिन्ही पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.