चंद्रकांत पाटील यांची गच्छंती? महाराष्ट्र, दिल्ली विधानसभा पराभवानंतर भाजप कार्यकारिणी बैठकीत खांदेपालट होण्याची शक्यता
दिल्लीचे केंद्रीय नेतृत्व धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि दिल्ली निवडणुकीत झालेला मानहानीकारक पराभव विचारात घेऊन पदांची भाकरी फिरवत खांदेपालट करण्याचा निरणय केंद्रीय नेतृत्वाने घेतला, तर मात्र चंद्रकांत पाटील यांची गच्छंती नक्की आहे.
महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरुनही सत्ता स्थापन करण्यात आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जोर लाऊनही भाजपला दणदणीत अपयश आले. या अपयशानंतर भाजपमध्ये संघनात्मक पातळीवर खांदेपालट होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्र भाजप बद्दल सांगायचे तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचीही गच्छंती होणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. येत्या 15 आणि 16 तारखेला भाजप कार्यकारिणी बैठक (BJP Working Committee Meeting) पार पडत आहे. या बैठकीत संघनात्मक पातळीवर अनेक फेरबदल होऊ शकतात.
... तर चंद्रकांत पाटील यांची गच्छंती नक्की
महाराष्ट्र आणि दिल्ली पराभवानंतर भाजपमध्ये जोरदार विचारमंथन सुरु झाले आहे. या विचारमंथनाचे पडसाद भाजपच्या येत्या कार्यकारिणी बैठकीत पडू शकतात. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांचे स्थान जवळपास निश्चीत आहे. त्यांना पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळू शकते. मात्र, असे असले तरी, दिल्लीचे केंद्रीय नेतृत्व धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि दिल्ली निवडणुकीत झालेला मानहानीकारक पराभव विचारात घेऊन पदांची भाकरी फिरवत खांदेपालट करण्याचा निरणय केंद्रीय नेतृत्वाने घेतला, तर मात्र चंद्रकांत पाटील यांची गच्छंती नक्की आहे. तसे चंद्रकांत पाटील हे भाजपचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासून मानले जातात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही पाटील यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना पदावर सलगता मिळणे फारसे कठीण नाही. मात्र, महाराष्ट्र भाजपातील नाराज गटाचे म्हणने काय पडते यावरही बरेच काही अवलंबून आहेत.
महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचे दावेदार
महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक दावेदार आहेत. अर्थात प्रदेशाध्यक्ष पदासाठी भाजपच्या कोणत्याच नेत्याने उघड भाष्य केले नाही. मात्र, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोत तावडे ही नावे भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून आघाडवीर आहेत. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचे तिकीट नाकारण्यात आले. तर, पंकजा मुंडे यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. या पराभवामुळे भाजपतील ओबीसी गटामध्ये जोरदार नाराजी पसरली. दरम्यान विनोद तावडे वगळता पंकजा मुंडे आणि खडसे यांनी भाजप नेतृत्वार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उघड नाराजी व्यक्त केली होती. विनोद तावडे हे भाजपतील ज्येष्ठ नेते आहेत. प्रदेशाध्यक्ष पद आणि मंत्रीपद असा दुहेरी अनुभव आहे. तर, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे हे दोघेही भाजपमधील मास लिडर आहेत. त्यामुळे या नेत्यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही. हे ध्यानात घेता केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात खांदेपालट केला असता महाराष्ट्र भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळू शकतो. (हेही वाचा, महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून गाढवांना थोडा आराम मिळाला; शिवसेना मुखपत्रातून भाजपला टोला)
विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याककडून चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र भाजप अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. विधानसभा निवडणुकीदरम्यानच हा बदल घडला. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2020 मध्ये भाजपने तब्बल 288 पैकी तब्बल 160 जागा निवडूण आणण्याचे उद्दिष्ट ठेवले. प्रत्यक्षात मात्र भाजपची 105 जागांवर दमछाक झाली. मात्र, या निवडणूकीत शंभरीपार जागा मिळवणारा आणि राज्यातील सर्वात मोठा पक्ष नक्कीच ठरला. असे असतानाही भाजपला राज्यात सत्ता स्थापन करणे मात्र ठरले नाही. नाही म्हणायला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती राजवट हटल्यावर अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रपती भवनात पहाटे पहाटे जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी पण त्यांचे मुख्यमंत्रीपद आणि सरकार औटघटकेचेच ठरले. भाजपसाठी आणि पर्यायाने राजधानी दिल्लीतून महाराष्ट्रावर लक्ष ठेवणाऱ्या पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासाठ हा मोठाच धक्का होता. त्यामुळे याचाही विचार महाराष्ट्र भाजपतील संघटनात्मक बदलांमध्ये होतो का याबातब उत्सुकता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)