स्वाईन फ्लू: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा रद्द
अमित शाह यांना स्वाईन फ्लू (Swine Flu) झाल्याने रुग्णालायत दाखल झाले होते. अमित शाह यांनी स्वत:च ट्विटरद्वारे आपल्याला झालेल्या आजाराची माहिती दिली होती. त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार पूर्ण झाल्यनंतर नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शाह यांच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. तसेच, पक्षकार्यातही अडथळा निर्माण झाला होता.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह (BJP National President Amit Shah) यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. येत्या 24 तारखेला अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात ते पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणांना भेट देणार होते. यातील काही ठिकाणी शाह भाजप कार्यर्त्यांना मार्गदर्शन करणार होते. तसेच, महाराष्ट्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या बैठकाही होणार होत्या. मात्र, स्वाईन फ्लूच्या (Swine Flu) उपचारामुळे शाह यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र, पश्चिम बांगाल येथे पूर्वनियोजित असलेला शाह यांचा दौरा नियोजित वेळेनुसार पार पडेल असे भाजप सूत्रांनी म्हटले आहे.
दरम्यान, अमित शाह यांना स्वाईन फ्लू (Swine Flu) झाल्याने रुग्णालायत दाखल झाले होते. अमित शाह यांनी स्वत:च ट्विटरद्वारे आपल्याला झालेल्या आजाराची माहिती दिली होती. त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार पूर्ण झाल्यनंतर नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शाह यांच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. तसेच, पक्षकार्यातही अडथळा निर्माण झाला होता. मात्र, आवश्यक ते उपचार घेऊन पूर्ण बरे झाल्यानंतर अमित शाह हे रुग्णालयातून बाहेर पडले आहेत. तसेच, त्यांनी पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा पक्ष कार्य आणि राजकीय कार्रक्रमाला सुरुवात केली आहे. (हेही वाचा, स्वाईन फ्लू: अमित शाह यांच्या आजारपणाचा भाजपवर काय परिणाम होणार?)
भाजपचे निवडणूक जिंकून देणारे चाणक्य अशी अमित शाह यांची ओळख बनली आहे. खास करुन 2014मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मिळालेला दणदणीत विजय ही ओळख अधिक दृढ होण्यास कारणीभूत ठरला. 2014 नंतर देशात झालेल्या विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांपासून ते अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ते पालिका अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये भाजपला उत्तम यश मिळाले. यातील विधानसभा निवडणुका वगळता इतर सर्वच निवडणुकांमध्ये अमित शाह यांचा थेट सहभाग नसला तरी त्यांचे आदेश, निवडणूक व्यवस्थापण आणि बूथ लेवलपर्यंत काम करण्याची पद्धत कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची ठरल्याचे पाहायला मिळते.
(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2019 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

