राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांच्या टीकेला भाजप आमदार राम कदम यांचे प्रत्यूत्तर
कोरोनाविरोधी लढ्यात एकजूट दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra MOdi) यांनी येत्या रविवारी देशातील नागरिकांना दिवे उजळण्याबाबत आवाहन केले आहे.
कोरोनाविरोधी लढ्यात एकजूट दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra MOdi) यांनी येत्या रविवारी देशातील सर्व नागरिकांना दिवे उजळण्याबाबत आवाहन केले आहे. कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचे आहे. त्यासाठी या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा, असे पंतप्रधान म्हणाले होते. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावर राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जोरदार टीका केली आहे. या टीकेला भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. राम कदम यांनी ट्वीटरच्या माध्यामातून नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांना कोट करत एक ट्वीट केले आहे. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी 130 कोटी नागरिकांना केलेले आवाहन हे एकतेचा संदेश आहे, असे मत राम कदम यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोराना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी कर्फ्यूनंतर आता नागरिकांना दिवे उजळण्याबाबत आवाहन केले आहे. यावरून जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी पतंप्रधानाच्या आवाहनवर टीका केली होती. यांच्या टिकेला प्रत्यूत्तर देत राम कदम म्हणाले की, 'देश एका अवघड संकटाचा सामना करत असताना समस्त 130 कोटी देशवासी एकत्रितपणे या संकटाशी संघर्ष करत आहेत. या अंधकारमय परिस्थितीत तिमिराकडून प्रकाशाकडे जात असताना हातात आशेचा प्रकाशाचा दिवा घेऊन आम्ही 130 कोटी नागरिक या संकटाचा मुकाबला करायला एक आहोत हा एकतेचा संदेश!’ असे राम कदम ट्वीटरच्या माध्यातून म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा संवाद म्हणाले, 'तुमच्या योगदानाबद्दल देशाला अभिमान आहे'
रामदास कदम यांचे नवाब मलिक यांना प्रत्त्यूत्तर-
रामदास कदम यांचे जितेंद्र आव्हाड यांना प्रत्त्यूत्तर-
देशात कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 50 हजारंहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखो लोकांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. सध्या भारतातही कोरनाबाधीतांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)