BJP MLA Prashant Bamb: भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, साखर कारखाना सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप
त्या कागदपत्रांच्या अधारे बंब यांनी कारखाना सभासदांची फसवणूक केली आहे. ही फसवणूकही थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 15 कोटी 75 लाख रुपयांची आहे, असा आरोप करण्यात आला आहे. कारखान्यातील सभासदांनी याबाबत तक्रार दिली आहे.
औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात भाजप आमदार प्रशांत बंब (BJP MLA Prashant Bamb) यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. गंगापूर साखर कारखान्यातील (Gangapur Sugar Factory) निधीमध्ये अफरातफर केल्याचा प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्यावर आरोप आहे. या आरोपावरुन आलेल्या तक्रारीवरुन बंब यांच्याविरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्या आला आहे. (BJP MLA Prashant Bamb Has Been Booked) बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्रं तयार केली. त्या कागदपत्रांच्या अधारे बंब यांनी कारखाना सभासदांची फसवणूक केली आहे. ही फसवणूकही थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 15 कोटी 75 लाख रुपयांची आहे, असा आरोप करण्यात आला आहे. कारखान्यातील सभासदांनी याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आमदार बंब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडू सुरु करण्यात आला आहे.
गंगापूर साखर कारखाना विकला जाऊ नये. यासाठी साखर कारखान्यातील काही सभासदांनी एकत्र एक रक्कम जमा केली होती. ही रक्कम कारखान्याच्या खात्यावर आले. ही रक्कम जमा झाली त्या वेळी 15 कोटी 75 लाख रुपये इतकी होती. मात्र, कारखान्याच्या खात्यावर जमा झालेली ही रक्कम आणि कारखाना यांचा काहीही संबंध नाही, असे अध्यक्ष प्रशांत बंब यांनी कारखान्याच्या संचालकांना सांगितले. त्यामुळे सभासधांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी काही सभासदांनी एकत्र येत आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली.
काय आहे प्रकरण?
प्राप्त माहितीनुसार, सन 2013 मध्ये गंगापूर साखर कारखाना काही कारणांमुळे अडचणीत होता. कारखाना विकला जाण्याची शक्यता/परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी कारखाना विकला जाऊ नये. त्याची विक्री थांबावी यासाठी सभासदांनी डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले. पुढे कारखाना विक्रिचा व्यवहारच रद्द झाला. त्यामुळे कोर्टाकडून हे पैसे पुन्हा कारखान्याकडे आले. परंतू, हे पैसे कारखान्याचे नाहीत. या पैशांचा आणि कारखान्याचा काहीही संबंध नाही, असे अध्यक्ष बंब आणि इतर काही जणांनी सांगितले. त्यामुळे सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या प्रकरणात 14 सभासदांची फसवणूक झाल्याचा बंब यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान, बंब यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. या प्रकरणात पोलिसांनी न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे. परंतू, पोलिसांनी जर योग्य न्याय दिला नाही. तर आम्ही न्यायालयात जाऊ किंवा इतर कयदेशीर कारवाई करु, असेही सभासदांनी म्हटले आहे.