Bjp On Lok Sabha Vidhan Sabha Election 2024: 'बोलताना तोंडावर ताबा ठेवा', भाजपकडून मंत्र्यांना सक्त ताकीद; राजकीय भूमिका मांडण्याची केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच मुभा

त्यासाठी महाराष्ट्र भाजपने आगामी निवडणुकांसाठी 'महाविजय 2024' (BJP Mahavijay 2024) या संकल्पाची घोषणा केली आहे.

भाजप (संग्रहित प्रतिमा)

लोकसभा (Lok Sabha Elections 2024), विधानसभा (Assembly Elections 2024) निवडणुकांना अद्याप काहीसा अवकाश असला तरी बदलती राजकीय स्थिती पाहता भाजने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र भाजपने आगामी निवडणुकांसाठी 'महाविजय 2024' (BJP Mahavijay 2024) या संकल्पाची घोषणा केली आहे. या संकल्पाच्या माध्यमातून भाजपने महाराष्ट्रात लोकसभेसाठी 'मिशन 45' तर, विधानसभेसाठी 'मिशन 200' ची घोषणा केली आहे. भाजप राज्य कार्यकारिणीची एक बैठ नाशिक येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. निवडणुकीसाठी विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय हे प्रदेश संयोजक (निवडणूक इन्चार्ज) असणार आहेत. भाजपचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या द्वारे आज (11 फेब्रुवारी) ही घोषणा करण्यात आली. दरम्यान, या वेळी भाजपच्या सर्व मंत्री आणि प्रमुख नेत्यांना थेट तंबी देण्यात आली आहे. मंत्र्यांनी केवळ आपल्याच खात्याबाबत बोलावे. तसेच, मंत्री आणि इतर नेत्यांनी राजकीय भाष्य टाळावे. राजकीय विषयांवर केवळ देवेंद्र फडणवीसच बोलतील, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या.

देवेंद्र फडणीस यांनी या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना जुनाच आरोप पुन्हा नव्याने केला. महाविकासआघाडी सरकार हे केवळ भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. त्यांनी जनतेच्या हिताचा कोणताच निर्णय घेतला नाही. इतकेच नव्हे तर केवळ स्वत: आणि स्वत:च्या कुटुंबाचेच कसे भले होईल हे पाहिले. जनता वाऱ्यावर सोडली. विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यासाठीही प्रयत्न केले. मला अटक करण्याही मविआ सरकारचा प्रयत्न होता. त्यांनी जंग जंग पछाडले. परंतू, मला अटक करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते आतमध्ये गेले. मात्र, ते मला अटक करु शकले नाही, असे फडणवीस यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Priya Berde Quit NCP: अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपामध्ये प्रवेश; कारण अद्याप गुलदस्त्यात)

भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे) सरकारवर बेकायदेश, घटनाबाह्य आणि गद्दारांचं सरकार असल्याचा आरोप केला जातो. परंतू, हे सरकार गद्दारांचे नव्हे तर खुद्दारांचे आहे. महाविकासआघाडी सरकार सत्तेवर आले होते तेच मुळी जनतेचा विश्वासघात करु. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेनच. परंतू, 2024 मध्ये दीडपट संख्या घेऊन परत येईन, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला. 2024 ची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल. हा सामना आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच जिंकू असेही फडणीस म्हणाले. आता आपल्याला काही मिळवायचे नाही. केवळ जनतेसाठी काम करायचं आहे, असं देवेंद्र फडणवी म्हणाले. हे करत असताना काहींना पदं मिळतील काहींना मिळणार नाहीत.. पण आपण जनतेसाठी काम करत राहायचं असंही फडणवीस म्हणाले.