Sudhir Mungantiwar Slams Nawab Malik: ड्रग्जप्रकरणी भाजपवर गंभीर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांना सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर

दरम्यान, क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीत भाजपच्या एका नेत्याचा मेव्हणाही होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

Sudhir Mungantiwar | (Photo Credit: ANI)

मुबई-गोवा-मुंबई क्रुझवर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीत भाजपच्या एका नेत्याचा मेव्हणाही होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. तसेच उद्या पत्रकार परिषद घेऊन त्या नेत्याच्या नावाची घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांवर भाजप नेते आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ड्रग्स प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारचा प्रयत्न आहे का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

नुकताच सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले की, क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकार प्रयत्न करत आहे, असे वाटत आहे. देशातील युवा पीढीला उद्ध्वस्त करणाऱ्यांना राजकीय संरक्षण नको. आरोपी हा कोणताही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असला तरी त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हे देखील वाचा- Cruise Ship Drug Case: ड्रग्ज प्रकरणात Aryan Khan ला दिलासा नाही; कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Watch Video)

"एनसीबीच्या सुरु असलेल्या चुकीच्या कारवाईसंदर्भात मला माहिती उघड करायची आहे. यासाठी थोडा वेळ लागणार असून याप्रकरणी शनिवारी पत्रकार परिषद घेणार आहे," असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात थिणगी पडण्याची शक्यता आहे. तसेच नवाब मलिक उद्या भाजपच्या कोणत्या नेत्याचे नाव घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif