Parinay Phuke Car Accident: डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात, थोडक्यात बचावले

परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातात वाहनाची मोठी हानी झाली. फुके (Parinay Phuke Car Accident) थोडक्यात बचावले

Parinay Phuke | (Photo credit: archived, edited, representative image)

Bhandara Gondia Lok Sabha Constituency: भाजप नेते आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातात वाहनाची मोठी हानी झाली. फुके (Parinay Phuke Car Accident) थोडक्यात बचावले. प्राप्त माहितीनुसार, रस्त्यावरुन प्रवास करत असाताना समोरुन आलेल्या एका ट्रकने फुके यांच्या वाहनाला हुलकावणी दिली. त्यामुळे फुके यांचे वाहन कथीतरित्या अनियंत्रीत झाले आणि महामार्गावरील दुभाजकाला धडकले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (17 एप्रिल) मध्यरात्री 2 च्या सुमारास घडली.

लोकसभा निवडणूक प्रचारदौऱ्यावरुन परतताना अपघात

परिणय फुके हे भाजपचे महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. भंडारा लोकसभा मतदारसंघात महायुतीद्वारे उमेदवार असलेल्या सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. प्रचार दौऱ्यावरुन परतत असताना रात्री उशीरा त्यांच्या वाहनाचा साकोली परिसरात अपघात घडला. रात्रीच्या वेळी ते लाखनी येथे परतत असताना ही घटना घडली. घटनेचा सविस्तर तपशील अद्याप उपलब्ध झाला नाही. मात्र, प्राप्त माहितीनुसार, महामार्गावरुन निघाले असता एक वाहन समोरुन आले. या वाहनाने फुके यांच्या वाहनाला हुलकावणी दिली. मात्र, चालकाने समयसूचकता दाखवत वाहन बाजूला घेतले. मात्र, त्यामुळे वाहन अनियंत्रित झाले आणि रस्तादुभाजकावर आदळले. (हेही वाचा, Nana Patole Accident : नाना पटोले यांच्या वाहनाला अपघात, काँग्रेस नेत्यांकडून गंभीर आरोप)

वाहनाचे मोठे नुकसान

प्राप्त माहितीनुसार, परिणय फुके या अपघातातून बचावले असले तरी त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात नैसर्गिक होता की घातपात याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या अपघाताची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी चौकशी सुरु करावी, अशी मागणी फुके यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. (हेही वाचा, MLA Ashish Jaiswal Convoy Accident : आमदार आशिष जैस्वाल यांच्या ताफ्याचा अपघात; स्वीय सहाय्यकासह दोन जण जखमी)

नाना पटोले यांच्याही वानहाचा अपघात

दरम्यान, याच आठवड्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनालाही भीषण अपघात झाला होता. हा अपघात भंडारा शहरानजिक असलेल्या भीलवाडा गावाजवळ झाला. पाठिमागून आलेल्या भरधाव ट्रकने पटोले यांच्या वाहनाला धडक दिली होती. त्याही वेळी हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा आरोप पटोले यांनी केला होता. दरम्यान, या अपघातात नाना पटोले सुखरुप बचावले आहेत.

राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे राजकीय नेते रात्री अपरात्री प्रवास करत आहेत. सहाजिक भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील नेतेही याला अपवाद नाही. दरम्यान, नाना पटोले आणि परिणय फुके हे दोघेही एकाच लोकसभा मतदारसंघातून (भंडारा-गोंदीया) येतात. त्यामुळे दोन भीन्न राजकीय पक्षाच्या आणि त्यातही राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांच्या वाहनाचा एकाच आठवड्यात अपघात होणे हा योगायोग की यापाठिमागे आणखी काही कारस्थान? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.