Nilesh Rane criticizes Sanjay Raut: संजय राऊत एक नंबर ढोंगी आहेत; शेतकरी आंदोलनाला दिलेल्या भेटीवरुन निलेश राणे यांची टीका

दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दुपारी दिल्लीच्या सीमेवर जाऊन राकेश टिकैत यांची भेट घेतली आहे.

Nilesh Rane (Photo Credit: Twitter)

दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दुपारी दिल्लीच्या सीमेवर जाऊन राकेश टिकैत यांची भेट घेतली आहे. मात्र आता याच भेटीवरुन भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राऊत यांना ढोंगी म्हटले आहे. संजय राऊत दिल्लीतील आंदोलकांना भेटले. मात्र, कधी महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना भेटले नाहीत, असेही निलेश राणे म्हणाले आहेत. निलेश राणे यांच्या टिकेला अद्याप शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

शिवसेना नेता संजय राऊत यांच्या नेतृत्वात यावेळी शिष्टमंडळात विनायक राऊत,अनिल देसाई, अरविंद सावंत,राजन विचारे, प्रताप जाधव, कृपाल तुमाने आदींनी आज दुपारी शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. यावर निलेश राणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, ते म्हणाले की, जितक्या झटपट दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले तसे कधी मराठा आंदोलकांना भेटले नाहीत. महाराष्ट्रातील कुठल्याही आंदोलनाला संजय राऊत कधी गेले नाहीत. त्यांना महाराष्ट्रातले आंदोलनकर्ते नको असतात. फक्त राजकारणासाठी महाराष्ट्राचे नाव हवे असते. संजय राऊत एक नंबर ढोंगी आहेत, अशा आशयाचे ट्विट निलेश राणे यांनी केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे. हे देखील वाचा- Saamana Editorial on Budget: केंद्रीय अर्थसंकल्प 2021 म्हणजे डिजिटल घोड्यांवरून स्वप्नांची सैर; सामना च्या अग्रलेखातून टीका

निलेश राणे यांचे ट्विट-

दरम्यान शेतकरी आंदोलकांची चर्चा केल्यानंतर शिवसेना खासदारांनी घटनास्थळी पोलिसांनी लावलेल्या बंदोबस्ताची पाहणी केली आहे. पोलिसांनी लावलेल्या या बंदोबस्तावर खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.