Nana Patole On MNS: भाजप राज ठाकरेंचा कठपुतळी म्हणून वापर करत आहे, नाना पटोलेंचे वक्तव्य

हा पक्ष उद्ध्वस्त करणारा आहे, तो कोणाचेही भले घडवत नाही.

Nana Patole | (Photo Credits: Facebook)

रविवारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख नाना पटोले (Nana Patole) यांनी सोमवारी सांगितले की, अशा तणावामुळे राज्याची बदनामी होते. संभाव्य गुंतवणुकीवरही परिणाम होतो. ते म्हणाले, काही लोक लाऊडस्पीकरचा (Loudspeaker) मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे केवळ राज्याची बदनामी होत नाही तर संभाव्य गुंतवणुकीवरही परिणाम होतो. रोजगार निर्मितीला बाधा येते. घटनेने आपल्या सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी. राज्याची बदनामी करण्याचे नाटक बंद करावे, असे पटोले म्हणाले.

महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य असून कायद्याच्या वर कोणी नाही, असेही ते म्हणाले.  लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करत आहे. विनाकारण हा मुद्दा उपस्थित करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही. अस्थिरता आणि जातीय तेढ निर्माण करून राज्याचा विकास खुंटला जात आहे. तरुणांना भडकावण्यापेक्षा त्यांना रोजगार देण्याचा विचार राज ठाकरेंनी करायला हवा, असेही पटोले म्हणाले.

केंद्रातील मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी भाजप मनसे अध्यक्षांना वापरत आहे असा आरोप करून ते म्हणाले, राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला जाब विचारायला हवा होता. पण दुर्दैवाने, त्यांच्या भाषणात सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर एक शब्दही नव्हता. भारतीय जनता पक्ष राज ठाकरेंचा कठपुतळी म्हणून वापर करत आहे, असेही पटोले म्हणाले. हेही वाचा  Loudspeaker Row: 'इतर राज्यातील लोक महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकतात'; गुप्तचर विभागाचा अहवाल

रविवारी मुंबईत भाजपच्या बुस्टर डोस मेळाव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाबद्दल पटोले म्हणाले की, हे केवळ भगव्या पक्षाच्या सत्तेत येण्याच्या हताशतेचे प्रतिनिधित्व आहे. ते आता फुशारकी मारत आहेत की त्यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली. अयोध्येतील मशीद भाजपने पाडल्याचा दावा खरा मानला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे पटोले म्हणाले. भाजप मुळातच विध्वंसक पक्ष आहे. हा पक्ष उद्ध्वस्त करणारा आहे, तो कोणाचेही भले घडवत नाही. ते काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत, जो लोकांना एकत्र आणण्यात आणि नवीन गोष्टी निर्माण करण्यात विश्वास ठेवतो.