Praniti Shinde On BJP : भाजपने देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली, देश ५० वर्ष मागे गेला; सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आक्रमक

मोठ्या संख्येने नागरिक सभेला उपस्थित राहिले होते. भाजपकडून आजपर्यंत नागरिकांच्या झालेल्या फसवणूकीचा पाढाच प्रणिती शिंदे यांनी वाचून दाखवला.

Photo Credit - Facebook

Praniti Shinde On BJP : राज्यात सध्या लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election)ची रणधुमाळी सरू आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच उमेदवार वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळें(Supriya Sule)नी डेमूमधून प्रवास करत मतदारांशी संवाद साधला होता. दुसरीकडे, सोलापूरात आपल्या मतदारसंघात प्रणिती शिंदेंनी सभा घेण्यास सुरूवात केली आहे. सोलापुरात रविवारी रात्री त्यांची सभा पार पडली. या सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना प्रणिती शिंदेंनी भाजप (BJP)वर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. (हेही वाचा :Praniti Shinde on BJP: योगी-महाराज राजकारणात आल्याने देश उद्ध्वस्त होऊ लागलायं; प्रणिती शिंदे यांचा भाजपवर निशाणा )

भाजपची विचारसरणी ही धर्माची आणि जातीची आहेत. अशा विचारसरणीमुळे देशाला धर्माची आणि जातीची कीड लागली आहे. त्यामुळे देश ५० वर्ष मागे गेला. तर, सोलापूर आज 20 वर्ष मागे गेला आहे. अशा शेलक्या शब्दांत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंनी भाजपवर आक्रमक झाल्या आहेत. भाजपकडून नागरिकांच्या होत असलेल्या फसवणूकांवरही प्रणिती शिंदे यांनी बोट ठेवलं. "समोरून उज्वला योजना आणतात आणि मागून पिवळं कार्ड बंद करतात. धान्यच मिळत नसेल तर त्या सिलेंडरवरती काय शिजवायचं?, भाजपच्या कामांचा पाढा वाचत प्रणिती शिंदेंनी असा सवाल उपस्थित केला आहे. (हेही वाचा :Rohit Pawar On Praniti Shinde: प्रणिती शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले - त्यांना बोलण्याचा पुर्ण अधिकार )

"हाथी के दांत दिखाणे के एक और खाणे के एक" विकास करायचा असं म्हणायचं आणि जाती, धर्मावर मत मागायची हे भाजपचं काम आहे. धर्मात-जातीत तेढ निर्माण करतायतं. आधी आपण असे नव्हतो. निवडणूकीच्या वेळेस आपण सर्वधर्म समभावावर मतदान करायचो. मात्र, आता ही विचारसरणी लोकांना धर्मावर मतदान करायला प्रवृत्त करत आहेत, असा आरोपही प्रणिती शिंदेंनी भाजपवर केला आहे.