IPL Auction 2025 Live

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 मध्ये वापरलेला फॉर्म्युला शिवसेनेला पटणार का?

तसेच भाजप (BJP)-शिवसेना (Shiv Sena) मध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेल्या वाद पाहता सत्ता स्थापनेबाबत विविध विधाने राजकीय नेते मंडळी करत आहेत.

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात सत्ता स्थापनाचा अद्याप मुहूर्त ठरलेला नाही. तसेच भाजप (BJP)-शिवसेना (Shiv Sena) मध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेल्या वाद पाहता सत्ता स्थापनेबाबत विविध विधाने राजकीय नेते मंडळी करत आहेत. याच पार्श्वभुमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 1095 मध्ये वापरलेला फॉर्म्युल्याचा सुचवला आहे. त्यानुसार अधिक जागा मिळणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि कमी जागांवर विजय मिळवणाऱ्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे असा फॉर्म्युला होता. मात्र आता शिवसेनेला 50-50 चा फॉर्म्युला सोडून 24 वर्ष जुन्या फॉर्म्युलाचा वापर करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेने पहिल्यांदा 1990 मध्ये औपचारित रित्या युती करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर दुसऱ्या वेळेस 11195 मध्ये शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र निवडणूकीच्या रिंगणात उतरले. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते प्रमोद महाजन आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकर यांच्या मध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की, भाजप केंद्रात राजकरण करणार आणि शिवसेना राज्यात राजकरण करणार.

तर दोन्ही पक्षात ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने 169 जागांवर निवडणूक लढवत 73 जागांवर विजय मिळवला होता. तसेच भाजपने 116 जागांवर निवडणूक लढवत 65 जागांवर विजय मिळवला होता. पक्षात ठरल्याप्रमाणे शिवसेनेला मुख्यमंत्री पद आणि भाजपला उपमुख्यमंत्री पद मिळाले होते. त्यावेळी भाजपला गृह, राजस्व आणि पीडब्लूडी सारखे प्रमुख मंत्रालय मिळाले होते. त्यानुसार भाजप-शिवसेनेने पाच वर्ष सरकार उत्तमपणे पार पाडले.(महाराष्ट्रात सत्ता स्थापनासाठी राष्ट्रवादी कडून शिवसेनेला समर्थन मिळावे म्हणून नवा प्रस्ताव, केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद सोडण्याची गळ)

यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपला 105 जागा आणि 56 जागांवर शिवसेनेला विजय मिळाला आहे. शिवसेना चार अपक्ष उमेदवारांकडून समर्थन मिळाले असल्याचा दावा करत आहे. दुसऱ्या बाजूला भाजप अपक्षमधील 15 आमदार आमच्यासोबत असल्याचे म्हणत आहे. महाराष्ट्रात विधानसभेचा कार्यकाळ येत्या 9 नोव्हेंबरला संपणार आहे. तत्पूर्वी सत्ता स्थापन करणे महत्वाचे आहे.