IPL Auction 2025 Live

BJP Second List Of Candidates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी? वाचा

या यादीत नाशिक मध्य मधून देवयानी फरांडे, उल्हासनगरमधून कुमार आयलानी, पेणमधून रवींद्र पाटील, जतमधून गोपीचंद पडळकर, अकोल्यातून विजय अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.

BJP | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

BJP Second List Of Candidates: भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवरांची दुसरी यादी (BJP Second List Of Candidates) जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये भाजपने एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत नाशिक मध्य मधून देवयानी फरांडे, उल्हासनगरमधून कुमार आयलानी, पेणमधून रवींद्र पाटील, जतमधून गोपीचंद पडळकर, अकोल्यातून विजय अग्रवाल, खडकवासला येथून भीमराव तापकीर, पुणे कंन्टोनमैंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

यापूर्वी भाजपने पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महायुतीत जागावाटपासंदर्भात यशस्वी चर्चा झाली आहे. तथापी, उर्वरित सात ते आठ जागांच्या वाटपाबाबत तीन मित्रपक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याचं महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2024: शिवसेना (UBT) 15 आणि काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पाहा यादी)

भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे -

महायुतीतील तीन मित्रपक्षांपैकी भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक यादी जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 55 जागांवर लढणार आहे.