Maharashtra Assembly Elections 2019: भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर शिक्कामोर्तब

मात्र, युती करुनही दोन्ही पक्षांनी जागावाटपाचा मुद्दा नेमका कसा सोडवला याबाबत सांगितले नव्हते. आता तर भाजपने थेट उमेदवार यादीच जाहीर केली आहे.

BJP Logo (Photo Credits: IANS)

BJP Candidates First List For Maharashtra Assembly Elections 2019:  विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण-पश्चिम, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना कोथरुड, शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली आहे.  शिवसेना (Shiv Sena) - भाजप (BJP)  युती झाल्याची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वावरे केली. मात्र, युती करुनही दोन्ही पक्षांनी जागावाटपाचा मुद्दा नेमका कसा सोडवला याबाबत सांगितले नव्हते. आता तर भाजपने थेट उमेदवार यादीच जाहीर केली आहे.

भाजप उमेदवार यादी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिल्या यादीतील नावे इथे पाहा

भाजपची पहिली यादी काही महत्त्वाची नावे

नागपूर दक्षिण-पश्चिम - देवेंद्र फडणवीस

कोथरूड - चंद्रकांत पाटील

सातारा- शिवेंद्रराजे भोसले

कसबा पेठ - मुक्ता टिळक

कराड दक्षिण - अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान अध्यक्ष)

बेलापूर - मंदा म्हात्रे

विलेपार्ले - पराग अळवणी

जामनेर - गिरीश महाजन

वडाळा (मुंबई) - कालिदास कोळंबकर

पुणे पर्वती - माधुरी मिसाळ

घाटकोपर (प.) - राम कदम

जळगाव जामोद - संजय कुटे

शहादा - राजेश पाडवी

जळगाव शहर - सुरेश भोळे

सिंदखेडा - जयकुमार रावल

धुळे ग्रामीण - ज्ञानज्योती बदाणे

अमळनेर - शिरीष चौधरी

चाळीसगाव - मंगेश चव्हाण

माण - जयकुमार गोरे

परळी - पंकजा मुंडे

तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील

अकोले - वैभव पिचड

राहुरी - शिवाजीराव कर्डिले

औसा - अभिमन्यू पवार

वांद्रे पश्चिम - आशिष शेलार

एएनआय ट्विट

भाजपने पहिल्या यादीत 125 उमेदवारांची नावे जाहीर केली. यात विद्यमान 52 आमदारांवर विश्वास व्यक्त करत भाजपने या आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. यात 12 महिला आमदारांचा समावेश आहे. 12 जागांची आदलाबदल केल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विद्यमान मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांची नावे या यादीत नाहीत.



संबंधित बातम्या

Superstition: पितृत्व प्राप्त करण्यासाठी जिवंत कोंबडीचे पिल्लू गिळले, तरूणाचा मृत्यू; छत्तीसगडमधून अंधश्रद्धेची धक्कादायक घटना समोर

Maharashtra Forts: गड-किल्ल्यांवर गैरकृत्य, मद्यप्राशन केल्यास खैर नाही; शिक्षेसह 1 लाखांचा दंडही भरावा लागणार

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांत नाराजी नाट्य सुरु; छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, रवी राणा सह पहा कोण कोण झाले खट्टू