Ramdas Athawale suggests Eknath Shinde: रामदास आठवले यांचा एकनाथ शिंदे यांना सल्ला; मुख्यमंत्री पदाबाबत काय म्हणाले? घ्या जाणून

महाराष्ट्रात महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत सुरू असलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद किंवा आघाडीतील वरिष्ठ पदाचा स्वीकार करावा, असा सल्ला दिला आहे.

Ramdas Athawale | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवणूक निकाल जाहीर होऊन आता बरेच दिवस उलटून गेले तरीही राज्यात नवे सरकार अस्तित्वात येऊ शकले नाही. महायुती सरकारला राज्यातील जनतेने पुन्हा एकदा समर्थन दिले. त्यामुळे भाजप प्रणित महायुती पुन्हा एकदा सत्तेत येणार हे निश्चित असले तरी, मुख्यमंत्री कोण होणार? यामध्ये सगळे गाडे अडले आहे. एका बाजूला विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रमुख दावेदार आहेत. असा स्थितीत केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिंदे यांना सल्ला दिला आहे. त्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद किंवा आघाडीतील वरिष्ठ पदाचा स्वीकार करावा, असे सूचवले आहे.

रामदास आठवले यांनी खुलासा केला की, भाजप हायकमांडने शिंदेंना आणखी एक टर्म मुख्यमंत्री म्हणून देऊ करण्यास नकार दिला आहे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च पदासाठी पसंती दिली आहे. विशेषतः नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीला लक्षणीय विजय मिळवून दिल्यानंतर, भाजपच्या निर्णयामुळे शिंदे नाराज असल्याचे त्यांनी नमूद केले. ते संसदेबाहेर एनडीटीव्हीशी बोलत होते. (हेही वाचा, Eknath Shinde Discharged: एकनाथ शिंदे यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयातून डिस्चार्ज; जाणून घ्या प्रकृतिची स्थिती)

एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाचाही पर्याय

भाजपकडे जास्त आमदार असूनही मागील सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या देवेंद्र फडणवीसांनी स्थापित केलेल्या उदाहरणावर आठवले यांनी प्रकाश टाकला. देवेंद्र फडणवीस यांनी आधी केल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा विचार करावा, अशी माझी सूचना आहे. जर ते तयार नसतील तर ते महायुतीच्या अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारू शकतात किंवा केंद्रीय पदाचा विचार करू शकतात ", असे आठवले म्हणाले. (हेही वाचा, Ramdas Athawale On New Maharashtra CM: एकनाथ शिंदे नाराज! देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार; रामदास आठवलेंचा दावा)

महायुतीचे संख्याबळ किती?

युतीमध्ये भाजपला 132, तर शिवसेना 57 आणि राष्ट्रवादीला 41 आमदारांसह बहुमत मिळाल्यामुळे मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळवण्यासाठी भाजपतील घटक पक्ष उत्सुक आहे. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित असून शपथविधी सोहळा गुरुवारी होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवल्याचे सांगत, त्यांच्या योगदानाची दखल भाजपने घ्यावी, असे आवाहन गेल्या आठवड्यात शिवसेना नेत्यांनी केले आहे. मात्र, अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोडत, सरकार स्थापनेत अडथळा आणणार नाही, असे शिंदे यांनी स्वतः जाहीरपणे सांगितले आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुति आघाडीने महाराष्ट्र विधानसभेच्या 288 पैकी 230 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले. भाजपाचे वर्चस्व असल्याने, राजकीय विश्लेषकांचे असे मत आहे की युतीमध्ये शिंदे यांचा फायदा मर्यादित आहे, विशेषतः राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याने. भाजप आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, अंतर्गत तणाव दूर करण्यासाठी आणि नवीन सरकारसाठी सुरळीत संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी सर्वांच्या नजरा पक्षाच्या हायकमांडवर आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif