शिवसेनाप्रमुख Balasaheb Thackeray राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन 31 मार्चला; ऑनलाईन पद्धतीने पार पडणार कार्यक्रम

या भूमिपूजन सोहळ्यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली आहे. त्यानुसार, बुधवारी म्हणेजचं 31 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.

Balasaheb Thackeray | File Photo

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे (Balasaheb Thackeray National Memorial) भूमिपूजन येत्या 31 मार्चला म्हणजेचं बुधवारी होणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. मुंबई येथील शिवाजी पार्कमधील महापौरांच्या जुन्या निवास्थानी बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली आहे. त्यानुसार, बुधवारी म्हणेजचं 31 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या मंजुरीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात चालना मिळाली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर यावर्षीच्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी 400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. (वाचा -Nawab Malik on Lockdown: लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला न परवडणारा- नवाब मलिक)

दरम्यान, बाळासाहेब राष्ट्रीय स्मारकाचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामं केली जाणार आहेत. यासाठी 250 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

याशिवाय दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानविषयक कामे केली जाणार आहेत. यामध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा, गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्यूअल रियालिटी शो आणि तांत्रिक बाबींवर काम केले जाईल. यासाठी राज्य सरकारकडून 150 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif