Bhojpuri Actress Suman Kumari Arrested: मुंबई पोलिसांकडून High-Profile Sex Racket उद्ध्वस्त; भोजपूरी अभिनेत्री सुमन कुमारी हिस अटक

सुमन कुमारी (24) ही भोजपुरी अभिनेत्री असून ती ग्राहकांना मॉडेल्स पुरवते. या मॉडेल्स चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आलेल्या आणि अडचणींतून जात असतात. त्यांना पैशांची गरज असते. अशा तरुणींना, मॉडेल्सना हेरुन सुमन कुमारी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले, असा आरोप आहे.

Arrested | (File Image)

High-Profile Sex Racket Uncovered In Mumbai: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा (High-Profile Sex Racket) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका भोजपुरी अभिनेत्रीला (Bhojpuri Actress ) अटक झाली आहे. सुमन कुमारी (Suman Kumari) असे तिचे नाव असल्याचे समजते. पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने (Social Services Branch) ही कारवाई केली. मुंबई येथील आरे कॉलनी परिसरातील रॉयल पाम हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवले. या कारवाईत पोलिसांना मिळालेली माहिती खरी ठरली. अभिनेत्री या सापळ्यात पडली. ही अभिनेत्री प्रति मॉडेल 50,000 ते 80,000 रुपये किंमतीची वाटाघाटी करताना ती पकडली गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, अभिनेत्रीला पोलीस कोठडी मिळाली नाही. या सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींना ओळखण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी तपास सुरू आहे. अशा हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटच्या वाढत्या घटनांबाबत पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, नागरिकांना कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल आढळल्यास पोलिसांना तातडीने माहिती द्यावी असे म्हटले आहे. (हेही वाचा, Sacred Tree in Bali: 700 वर्ष जुन्या वृक्षासमोर नग्न छायाचित्रे काढल्यामुळे मॉडेलला केले हद्दपार, पाहा फोटो)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन कुमारी (24) ही भोजपुरी अभिनेत्री असून ती ग्राहकांना मॉडेल्स पुरवते. या मॉडेल्स चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आलेल्या आणि अडचणींतून जात असतात. त्यांना पैशांची गरज असते. अशा तरुणींना, मॉडेल्सना हेरुन सुमन कुमारी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले, असा आरोप आहे.

अधिक माहिती अशी की, मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अभिनेत्रीला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, सुमन कुमारी सहा वर्षांपासून मुंबईत राहत होती, मात्र तिने सेक्स रॅकेटमध्ये कधीपासून काम करायला सुरुवात केली, याची माहिती उपलब्ध नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement