Bhiwandi Fire: भिवंडीत भंगारच्या गोदामाला भीषण आग; आठ दुकानं जळून खाक
या आगीमध्ये अनेक वाहन देखील आजीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती मिळत आहे.
भिंवंडीत पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील वलपाडा परिसरात भंगारच्या गोदामात अचानक भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत भंगारच्या चार गोदाम आणि चार दुकान असे एकूण आठ गोदामासह दुकान जळून खाक झाली आहे. ही आग इतकी भीषण होती की या आगीच्या भक्ष्यस्थानी संपूर्ण भंगारच गोदाम तसेच दुकान, होटेल जळून खाक झाले आहे. बाजूलाच एक पेट्रोल पंप (Petrol Pump) होतं त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (हेही वाचा - Mumbai Fire: सांताक्रूझ पश्चिम येथील धीरज व्यावसायिक केंद्रात भीषण आग; अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल (Video))
अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या व या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले. या आगीमध्ये अनेक वाहन देखील आजीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी नारपोली पोलीस दाखल झाले होते. या आगीत तब्बल आठ गोदाम व दुकान जळून खाक झाल्याचे घटना घडली असून, या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
भिवंडी तालुक्यातील भंगारच्या गोदामासह एकूण आठ दुकानात आग पसरल्याने परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळत होते. ज्या ठिकाणी ही आग लागली त्याच परिसरात बाजूला एक पेट्रोल पंप होते. एवढचं नव्हे तर पेट्रोल पंपावर पेट्रोल ने भरलेले दोन टँकर देखील होते. या आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहेत. अग्निशमन दलाने मोठ्या शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.