bangladeshi Citizens In Bivandi: भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई, नऊ अवैध बांगलादेशींना केली अटक
नऊ जणांनी बनावट पॅन कार्ड व आधार कार्ड तसेच पोस्ट ऑफिसचे पास बुक मिळविले तसेच बनावट कागदपत्रे मिळवून ते सरकारला खरे असल्याचे भासवून सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले आहे.
ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील सरावली गावातून नऊ अवैध बांगलादेशींना अटक करण्यात आली. भिवंडी गुन्हे शाखेने टेक्सटाईल कंपणीवर (Bhivandi crime branch raid on textile company) छापा टाकला असुन 9 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. टेक्सटाईल कंपणीमध्ये कामगार म्हणून तेआढळून आले होते. या नऊ जणांनी बनावट पॅन कार्ड व आधार कार्ड तसेच पोस्ट ऑफिसचे पास बुक मिळविले तसेच बनावट कागदपत्रे मिळवून ते सरकारला खरे असल्याचे भासवून सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले आहे. सलीम अमीन शेख (30), रासल अबुल हसन शेख (27), मो.शाहीन मोहम्मद अकबर अली शेख (24), मोहम्मद मासुम शोयदुल्ला इस्लाम(21), तरुणमणीराम त्रिपुरा (21), सुमनमनीराम त्रिपुरा (21), इस्माईल अबुताहेर खान (19), आजम युसूफ खान (19), मोहम्मद आमीर अबुसुफियान (26) अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
Tweet
भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Thane crime branch PI Ashok Honmane) अशोक होनमाने यांना गुप्त माहिती मिळाली की, नऊ बांगलादेशी हे भारताचे अधिकृत पासपोर्ट (Indian Passport) अथवा बांगलादेशचा व्हिसा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने देशात आले आहेत. हे बांगलादेशी दलालाच्या मदतीने बांगलादेशातून हावडा रेल्वे स्टेशन येथे येवून रेल्वेने प्रथम कल्याण व नंतर भिवंडीतील सरवली येथे अनधिकृतपणे वास्तव्यास राहत होते. तसेच अवनी टेक्सटाईल्समध्ये (Avani textiles in Bhivandi) काम करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. (हे ही वाचा Mumbai Crime: मुंबईमध्ये एका व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्या प्रकरणी फॅशन डिझायनरसह तीन जणांना अटक, एक आरोपी फरार)
नऊ बांगलादेशींना कोनगाव पोलिसांच्या ताब्यात देऊन शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच बांगलादेशी नागरिकांच्या अटकेने भिवंडीत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)