Bhaskar Jadhav Abusing: शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी रागाच्या भरात वयोवृद्धाला केली शिवीगाळ, रत्नागिरीतील ग्रामदेवेतेच्या मंदिरातील व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून सत्तेत असलेल्या नेत्याने असा प्रकार करणे हा शरमेची बाब असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

Bhaskar Jadhav

मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी रागाच्या भरात एक वयोवृद्ध व्यक्तीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाला असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. TV9 मराठीने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील (Ratnagiri)  ग्रामदेवतेच्या मंदिरात हा प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार शारदा देवी मंदिर ट्रस्ट पदाधिकारी आणि ग्रामस्थ समिती यांच्या बैठकीदरम्यान झाला. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून सत्तेत असलेल्या नेत्याने असा प्रकार करणे हा शरमेची बाब असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

TV9 मराठी दिलेल्या माहितीनुसार, या शारदा देवी मंदिरात ट्रस्टचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ कमिटी यांची बैठक सुरु होती. त्यावेळ भास्कर जाधव यांनी या बैठकीत येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. या गोंधळात त्यांचा जिभेवरचा ताबा सुटला आणि त्यांनी मंदिरातच अर्वाच्य भाषेत एका वृद्ध माणसाला शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार एक जण मोबाईल मध्ये शूट करत असता भास्कर जाधवांनी त्यालाही रोखून शिवीगाळ केली. मात्र मंदिराच्या सीसीटीव्ही मध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. कोल्हापूर: शारदीय नवरात्रोत्सवात महालक्ष्मी मंदिर भाविकांसाठी राहणार बंद

यासंदर्भातील कुठलीच तक्रार अद्याप नोंदवलेली नाही. संबंधित मारहाणीचा आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ 6 ऑक्टोबरचा आहे. गावच्या मंदिरातील प्रश्नाबाबत बैठकीत चर्चा सुरु असताना भास्कर जाधवांनी मंदिरात अशा पद्धतीने धिंगाणा घातला. सत्तेत असलेल्या पक्षनेत्याने असा प्रकार करणे शोभत नाही अशी प्रतिक्रिया जनतेमधून उमटत आहे.

तसेच दुसरीकडे महाराष्ट्रात अनलॉक 5 च्या टप्प्यात हॉटेल्स, बार, मॉल सुरु करण्यात आली आहे. मात्र अद्याप मंदिरे सुरु करण्यात आली नसल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.