Scientist Bhaskar Halami: गडचिरोलीचा आदिवासी मुलगा झाला अमेरीकेचा मोठा शास्त्रज्ञ, भास्कर हिलामीने रोवला भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मोठे झाले भास्कर हिलामी आता अमेरिकेतील मेरीलँडमधील बायोफार्मास्युटिकल कंपनी, सिरनॉमिक्स इंकच्या संशोधन आणि विकास विभागात वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.
स्वप्न बघणं आणि ते पूर्ण करणं यांसाठी तुम्ही कायम प्रयत्नशिल असणं महत्वाचं आहे. ह्याचं एक उदाहरण म्हणजे अमेरीकेचे जेष्ठ शास्त्रज्ञ भास्कर हिलामी (Scientist Bhaskar Halami). शास्त्रज्ञ हिलामी (Bhaskar Halami) हे मुळचे गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या एका दुर्गम खेडेगाव चिरचडी गावचे रहिवाशी. शास्त्रज्ञ होण्यासाठी हायक्लास एज्युकेशन (High Education) तर सोडा पण दोन वेळचं जेवण देखील डॉक्टरांच्या नशीबी नव्हतं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मोठे झाले भास्कर हिलामी आता अमेरिकेतील (America) मेरीलँडमधील बायोफार्मास्युटिकल कंपनी, सिरनॉमिक्स इंकच्या संशोधन आणि विकास विभागात वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. ही कंपनी अनुवांशिक औषधांमध्ये संशोधन करते आणि शास्त्रज्ञ हलामी आरएनए उत्पादन आणि संश्लेषणाची जबाबदारी पार पाडतात.
पीटीआयला (PTI) दिलेल्या मुलाखाती दरम्यान शास्त्रज्ञ भास्कर यांनी आपला जिवनप्रवासा बद्दल सांगितलं आहे. शास्त्र भास्कर हलामीचा हे चिरचडी (Chirchadi) गावातील पहिले पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी मिळवणारे पहिले विज्ञान पदवीधर होते. हाता काम आणि पोटात अन्न नसतानाही भास्करांनी आपला एका खेडेगावातील विद्यार्थी ते अमेरीकेतील नामदार शास्त्रज्ञ या खडतर प्रवास खरचं प्रेरणादायी आहे. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांचा आदर्श बाळगावा अशी त्यांची कामगिरी आहे. (हे ही वाचा:- Mumbai: मुंबईतील साहित्य चाचणी लॅब एनएबीएल प्रमाणपत्राची मानकरी, केंद्र सरकारकडून एनएबीएल बहुमान पटकावणारी बीएमसी राज्यातील पहिली महापालिका)
नाही सीबीएससी किंवा ना आयसीएसी हलामी यांनी त्यांचे प्राशमिक शालेय शिक्षण कसनसूर येथील आश्रमशाळेतून पूर्ण केले तर महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी यवतमाळमधील शासकीय विद्यानिकेतन केळापूर येथून एसएससी पर्यतचं शिक्षण पूर्ण केलं. शालेय शिक्षणानंतर गडचिरोलीतील एका साध्या महाविद्यालयातून भास्कर हलामी यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली त्यानंत नागपूरच्या विज्ञान संस्थेतून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. 2003 मध्ये, हलामी यांची नागपूर येथील प्रतिष्ठित लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (LIT) मध्ये सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नोकरी दरम्यान हलामी यांनी मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून पीएचडी मिळवली. तरी हलामी यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईवडिलांना दिलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)