IPL Auction 2025 Live

Two Sand Boa Snakes Recovered In Pune: दुर्मिळ मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

या आरोपीकडून दोन जीवंत मांडूळ जप्त करण्यात आले आहेत. हे मांडूळ आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांना विकले जातात. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मांडूळ सापाची तस्करी केली जाते.

Boa Snakes (PC - ANI)

Two Sand Boa Snakes Recovered In Pune: दुर्मिळ मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून (Bharati University police) अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून दोन जीवंत मांडूळ जप्त करण्यात आले आहेत. हे मांडूळ आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांना विकले जातात. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मांडूळ सापाची तस्करी केली जाते.

विकास रामचंद्र फडतरे असं या आरोपीचं नाव आहे. तो पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील रहिवासी आहे. विकास फडतरे याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात मांडूळांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रोडवर मांडूळांची विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी विकास फडतरे याला अटक केली. त्याच्यावर मांडूळाची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (हेही वाचा -  मुंबई: हॉटेलमधील थकलेली उधारी मागीतली म्हणून दोघा भावंडांकडून मालकाची धारदार शस्त्राने हत्या; आरोपी विरोधात गुन्हा दाखल)

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र पाटील यांनी सांगितले की, आम्ही आरोपीला कात्रज-कोंढवा भागातून अटक केली. त्यावेळी त्याच्या बॅगमधून दोन जिंवत मांडूळाची सुटका करण्यात आली. आरोपीने या मांडूळांची तस्करी कोठून केली आणि तो हे मांडूळ कुठे विकणार होता, यासंदर्भात आम्ही तपास सुरू केला आहे.