Bhandara Rain Update: भंडारा येथील गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले, पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरु
त्यामुळं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती.
भंडारा (Bhandara) जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शहर आणि जिल्ह्यातील जनजीवन विस्खळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन हात आहेत. नदी, नाले आणि धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. या पावसामुळे विदर्भातील सर्वात मोठा पाणी प्रकल्प असणाऱ्या गोसीखुर्द धरणाच्या (Gosikhurd Dam)पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व 33 गेट उघडले आहेत. सध्या धरणातून 1 लाख 31 हजार 320 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. (हेही वाचा - Radhakrishna Vikhe Patil सभागृहात डाराडूर झोपले, शिपाई पाचारण)
गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री 8 वाजता सर्वच्या सर्व 33 गेट अर्धा मीटरनं उघडले आहेत. त्यातून 1 लाख 31 हजार 320 पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सकाळपासून गोसीखुर्द धरण प्रशासनानं गेटची संख्या टप्प्याटप्प्यानं वाढवली. गोसीखुर्द धरणातून विसर्ग करण्यात येणाऱ्या पाण्याचा फटका चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना बसतो. नदी काठांवरील नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे.
भंडाऱ्यात गेल्या काही दिवसात जिह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. परिणामी गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 गेट उघडण्यात आली आहेत. पाऊस कमी झाल्यानं गेट बंद करुन केवळ दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, मागील तीन ते चार दिवसापासून सुरु झालेल्या या पावसामुळं नदी नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागलेले आहेत.