माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात फार काळ विरोधीपक्ष नेतेपद नाही - भय्याजी जोशी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भाग्यात फार काळ विरोधीपक्ष नेतेपद नाही. तसेच त्यांना फार काळ माजी मुख्यमंत्री म्हणून बोलावं लागणार नाही,’ असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी म्हटलं आहे. भय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीतील राजकारणात जाणार का? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात फार काळ विरोधीपक्ष नेतेपद नाही - भय्याजी जोशी
Bhaiyyaji Joshi (PC- ANI)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भाग्यात फार काळ विरोधीपक्ष नेतेपद नाही. तसेच त्यांना फार काळ माजी मुख्यमंत्री म्हणून बोलावं लागणार नाही,’ असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी म्हटलं आहे. भय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीतील राजकारणात जाणार का? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

'माजी मुख्यमंत्री' हे बिरुद फडणवीसांच्या नावामागे फार काळ राहणार नाही. हे पद त्यांच्या आयुष्यात अल्पकाळ राहिल, असंही भैय्याजी जोशी यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. भैय्याजी जोशी यांचं हे वक्तव्य राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप घडवण्याचे संकेत देणारं आहे. मात्र, आज राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ठाकरे सरकार 5 वर्षे टिकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. (हेही वाचा - महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार यात मला शंका वाटत नाही - शरद पवार)

मागील आठवड्यात देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला अधिक बळकटी मिळाली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सुधारित नागरिकत्व विधेयकाला समर्थन दिले. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याविषयी वेगवेगळे तर्क-विर्तक लागले जात आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2020 03:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).