Bhai jagtap Mumbai Congress President: भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड

तर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

भाई जगताप (Photo Credits-Twitter)

Bhai jagtap Mumbai Congress President:  विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी भाई जगताप यांच्यासह माजी आमदार चरणसिंह सप्रा आणि माजी मंत्री सुरेश शेट्टी यांची नावे चर्चेत होती. परंतु आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान भाई जगताप यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.(Maharashtra Gram Panchayat Election: महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात दाखल होणार)

काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी चरण सिंग सप्रा, प्रचार समितीच्या प्रमुखपदी मोहम्मद आरिफ नसीम खान आणि समन्व. समितीच्या प्रमुखपदी डॉ. अमजरजित सिंह मनहास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील एक  पत्रक ही काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे. (Chandrakant Patil On Shiv Sena: शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका)

Congress Press Release

महाराष्ट्रातील संघटनात्मक बदलांबद्दल दिल्लीत काँग्रेस पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक राज्याचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेस पक्षातील महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती दिसून आली. तर येत्या जानेवारी महिन्यात काँग्रेस पक्ष  महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अध्यक्ष बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

तर अशोक जगताप यांना भाई जगताप म्हणून ओळखले जात होते. भाई जगताप यांना काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विधान परिषदेचे आमदार म्हणून कार्य केले आहे. त्याचसोबत भाई जगताप यांनी विधान सभेत ही बाजी मारली होती. पण गेल्याच निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif