आजपासून Mumbai International Airport T2 ते दक्षिण मुंबई BEST च्या इलेक्ट्रिक बस प्रवाशांसाठी सुरू
त्यासाठी किमान 125 ते 175 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
कोरोना संकट हळूहळू शमण्यास सुरूवात झाल्यानंतर आता मुंबई मध्ये पुन्हा वर्दळ सुरू झाली आहे. नागरिकांना प्रवासासाठी अधिकाधिक पर्याय खुले केले जात आहेत यामध्ये आता मुंबई विमानतळ टर्मिनल 2 (Mumbai Airport T2) वरून दक्षिण मुंबईत (South Mumbai) जाण्यासाठी खास एसी इलेक्ट्रिक बस (AC Electric Bus) सुरू झाल्या आहेत. आज (25 ऑक्टोबर) पासून या प्रवासासाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबई मध्ये एअरपोर्ट पासून दक्षिण मुंबई, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉंईंट साठी 125 रूपये, सीएसएमटी पर्यंत 150 रूपये आणि गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ट्रायडंट आणि नरिमन पॉंईट पर्यंत 175 रूपये आकारले जाणार आहेत.
दरम्यान नव्या एसी बस मध्ये प्रवाशांना लगेज चार्जेस द्यावे लागणार नाहीत. नुकत्याच सुरू झालेल्या टी 2 एअरपोर्ट ते बीकेसी ही सेवा सोमवार ते शनिवार सुरू राहणार आहे. तर दक्षिण मुंबई साठी सुरू झालेल्या एसी बस आठवड्याचे सारे दिवस खुले राहणार आहे. नक्की वाचा: मुंबईकरांसाठी आजपासून इलेक्ट्रिक बस सेवा सुरु, 'या' मार्गावर धावणार .
मुंबई एअरपोर्ट ते बीकेसी 75 रूपये शुल्क असणार आहे. तर दिवसभरामध्ये 16 फेर्या होणार आहेत. तुम्हांला काही मदत हवी असल्यास बेस्टच्या हेल्पलाईन नंबर वर अर्थात 1800227550 वर संपर्क साधू शकतात. ओला, ओबर पेक्षा बेस्टचा पर्याय हा प्रवाशांसाठी सोयीचा आणि कमी खर्चिक आहे. तुमच्याकडे खूप लगेज नसेल तर बेस्टचया इलेक्ट्रिक बस हा एक उत्तम पर्याय आहे.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार मुंबई मध्ये 2027 पर्यंत बेस्टच्या केवळ इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. मुंबईत लवकरच तेजस्विनी बस प्रमाणेच केवळ महिलांसाठीच्या बस देखील उपलब्ध असणार आहेत. तसेच मुंबईतील सार्या बेस्ट बस डेपो मध्ये पब्लिक चार्जिंग स्टेशन उपलब्ध असणार आहेत. मुंबईत अशी 55 ठिकाणं असू शकतात. लवकरच बेस्ट डिजिटल तिकीटिंग सिस्टीम देखील सुरू करणार आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास धोरण सुरू केले आहे.