BEST Strike: बेस्ट संपावर बोलणी निष्फळ; मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक चर्चा, तोडगा नाही: शशांक राव

प्राप्त माहितीनुसार मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी कोस्टल रोडचं काम बंद पाडल्याचे वृत्त आहे.

Shashank Rao | (File Photo)

BEST Strike: बेस्ट कर्मचारी संपावर तोगडा काढण्यासाठी बोलावण्यात आलेली मंत्रालयातील बैठक संपली आहे. या बैठकीत संपाबाबत सकारात्मक चर्चा झाली मात्र, तोडाग निघू शकल नाही, अशी माहिती शशांक राव (Shashank Rao) यांनी दिली आहे. या माहितीवरुन सरकार आणि बेस्टचे संपकरी कर्मचारही यांच्यातील बोलणी पुन्हा एकदा निष्फळ ठरल्याचे पुढे येत आहे. बेस्ट संपाचा आज (14 जानेवारी) सातवा दिवस आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा इतक्या प्रदीर्घ काळ संप सुरु राहण्याची गेल्या दशकभरातील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सरकार काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, सातव्या दिवशी तरी बेस्टचा संप मिटेल आणि मुंबईकर प्रवाशांची कोंडीतून मुक्तता होईल, अशी आशा होती. मात्र, या संपावर वेळीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या अडचणींची जागा हाल या शब्दाने घेतली आहे. बेस्टच्या बसेस सुरु नसल्याने मुंबईची वाहिणी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर अधिक ताण पडतो आहे. तर, बेस्टचा संप म्हणजे आपल्याला कमाई करण्याची संधी असे सूत्र मानत काही रिक्षावाले प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. यात टॅक्सीवाल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईकरांची अधिकच कोंडी होत आहे. सकाळी कामावर जाताना आणि संध्याकाळी घरी परतताना त्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे. (हेही वाचा, ओला- उबेर चालक संपावर जाणार? प्रवाशांचे पुन्हा होणार नाहक हाल)

दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) कोस्टल रोडला (BEST Strike) पैसे देते तर, बेस्टला का नाही? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) कोस्टल रोडला विरोध दर्शवला आहे. प्राप्त माहितीनुसार मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी कोस्टल रोडचं काम बंद पाडल्याचे वृत्त आहे. बेस्ट कर्मचारी सध्या संपावर आहेत. बेस्ट संपाचा आज (सोमवार, 14 जानेवारी) सातवा दिवस आहे. दरम्यान, बेस्ट कर्मचारी संपावर लवकरात लवकर तोडगा काढा, अन्यथा आम्ही तमाशा करु असा इशारा मनसेने यापार्वी दिला होता.