BEST आता 100% इलेक्ट्रिक; 'चलो ॲप' किंवा 'चलो बसकार्ड' द्वारे प्रवाशांना मिळणार डिजीटल सेवा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांनी आज मुंबईतील सार्वजनिक वाहतूकीबद्दल महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या काहीच दिवसांमध्ये मुंबईतील बेस्ट बस (BEST Bus ) आता 100% इलेक्ट्रिक होणार असल्याची माहिती आदित्य यांनी दिली. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरुन लवकरच बेस्टच्या इलेक्ट्रिक बस (Electric Bus) धावताना दिसतील.

Aditya Thackeray | (Photo Credits: Twitter)

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांनी आज मुंबईतील सार्वजनिक वाहतूकीबद्दल महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या काहीच दिवसांमध्ये मुंबईतील बेस्ट बस (BEST Bus ) आता 100% इलेक्ट्रिक होणार असल्याची माहिती आदित्य यांनी दिली. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरुन लवकरच बेस्टच्या इलेक्ट्रिक बस (Electric Bus) धावताना दिसतील. याशिवाय प्रवाशांकडे अनेकदा सुट्टे पसै नसल्याने गैरसोय होते. यावर तोडगा म्हणून एक डिजिटल कार्डही (Digital Card सुरु केले जाणार आहे. परिणामी प्रवाशांना सुट्ट्या पैशांअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही.हे कार्ड रिचार्जही करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे कार्ड केवळ 100 रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी माहिती देताना सांगितले की, येणाऱ्या ऑगस्ट महिन्याअखेरीस मुंबईत सुमारे 900 इलेक्ट्रिक डबल डेकर बस रस्त्यांवर धावताना दिसतील. आज रोजी अशा प्रकारच्या 3337 बसेस उपलब्ध आहेत. आणखी जवळपास 10 हजार बसची आवश्यकता आहे. या बस पर्यावरणपुरक असाव्यात. तसेच, या एकूण बसपैकी जवळपास 50% बसेस या डबल डेकर असतील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, 'लाऊडस्पीकरवर बोलण्याऐवजी महागाईबाबत बोला'; आदित्य ठाकरे यांचा काका राज ठाकरेंना टोला)

आदित्य ठाकरे यांनी शाब्दिक कोटी करत म्हटले की, आपण बसमध्ये चढलो की, सतत पुढे चला पुढे चला म्हणतो. आताआपणही बरेच पुढे जात आहोत. पुढे जात राहणार. पुढे चला हाच आपला मंत्र राहिलेला आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, बेस्टला पुढे कसं नेता येईल यासाठी सातत्याने विचार आणि बोलणे सुरु असते. त्यानुसार कामही सुरु आहे. घटना कोणतीही असो. बेस्ट बस नेहमी कार्यरत असते. मग तो बॉम्बस्फोट असो की, पूर, किंवा कोविड काळ बेस्ट नेहमीच पुढे धावत राहिली आहे. बेस्ट बस खरोखरच बेस्ट असल्याचेही ते म्हणाले. बेस्टचा प्रवासही इलेक्ट्रीकपासूनच झाला. आता आपण पुन्हा एकदा इलेक्ट्रिककडे निघालो आहे. मुंबईतील बस या डबल डेकर असाव्यात असा नेहमीच माझा आणि मुख्यमंत्र्यांचा नेहमीच मनोदय राहिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

ट्विट

आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, डिजिटल कार्जचे अनावरन पुढच्या आठवड्यात केले जाईल. हे कार्ड प्रवासी बस कंडक्टर किंवा जवळच्या आगारात जाऊन केवळ 100 रुपयांमध्ये खरेदी करु शकतील. हे कार्ड रिचार्ज करता येऊ शकते. प्रवाशाने बसमध्ये प्रवेश करताच हे कार्ड मशिनला लावून 'टॅप इन' केले जाईल आणि बसमधून उतरताना 'टॅप आऊट' करुन तिकीट मिळेल. बेस्टच्या प्रत्येक बसमध्ये टॅपकार्ड बसविण्यात येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now