BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप कायम, आजही प्रवाशांचे होणार हाल
तर सोमवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईकरांचे नाहक हाल गेली दोन दिवस होत आहेत.
BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा आज (9 जानेवारी) दुसरा दिवस आहे. तर सोमवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईकरांचे नाहक हाल गेली दोन दिवस होत आहेत. त्यामुळे आजही वाहतूक सेवा ठप्प होणार का याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.
सोमवारी मध्यरात्री पासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिल्याने एक ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी धावली नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला तब्बल तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर आगामी आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमासाठी 690 कोटी रुपयांची तूट दाखवली गेली आहे. तसेच दोन हजार कोटी रुपयांची संचित तुट आहे. मात्र बेस्ट कर्माचाऱ्यांच्या संपामुळे रेल्वे प्रशासानाने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर जादा लोकल सोडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा -BEST Strike In Mumbai: 'बेस्ट बस बंद'च्या पार्श्वभूमीवर एसटीच्या 40 जादा गाड्या रस्त्यांवर , मेट्रो, लोकलमध्ये गर्दी)
संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध मेस्माअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी दिला होता.