BEST कर्मचारी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याच्या तयारीत, प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक

अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या (BEST Employees) मागण्या पूर्ण करण्यासाठी अखेर 8 जानेवारी पासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

BEST Bus ( Photo Credits: commons.wikimedia )

BEST Employees Strike: अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या (BEST Employees) मागण्या पूर्ण करण्यासाठी अखेर 8 जानेवारी पासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाकरिता मुंबईतील बेस्ट आगारांमध्ये कृती समितीच्या वतीने मतदान घेण्यात आले होते. यामध्ये 95 % कर्मचाऱयांनी संपाच्या बाजूने मतदान केल्याने अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्टच्या वाहतूक आणि वीज विभागातील कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत असल्याने मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

काय आहेत बेस्ट कर्माचाऱ्यांच्या मागण्या ?

बेस्ट आणि मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प एकाच वेळी जाहीर करावा

2017-18 मधील बोनससंबंधी तातडीने तोडगा काढावा.

कर्मचारी निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावावा

2007 पासून रुजू झालेल्या कर्मचाऱयांच्या वेतनश्रेणी बाबत निश्चितता

बेस्ट वर्कर्स युनियनने अशा केलेल्या विविध मागण्यांसाठी 7  जानेवारीच्या मध्यरात्री पासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपामध्ये सुमारे 30,000 कर्मचारी सहभागी असण्याची शक्यता आहे.