मुंबई मध्ये आता सुट्टी आणि रविवारच्या दिवशीही अधिक बस उतरणार रस्त्यावर; 1 एप्रिलपासून अंमलबजावणी
त्यामधून नियमित 35 लाख प्रवासी विक डेज मध्ये प्रवास करत असतात.
रेल्वेनंतर मुंबईकरांच्या शहरातील वाहतूकीचा पसंतीचा आणि किफायतशीर पर्याय म्हणजे बेस्ट बस. मुंबईत राविवारी आणि सुट्टीच्या दिवशी 60% बस रस्त्यावर उतरवल्या जातात. पण आता 1 एप्रिलपासून रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी नागरिकांना अधिक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून नव्या पॅटर्ननुसार आता 80% बस उतरवल्या जाणार आहेत.
मुंबई मध्ये रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी 40% टॅक्सी, रिक्षा देखील उतरवल्या जात नाहीत. यामुळे अनेकदा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मध्ये समस्या येतात. खाजगी क्षेत्रात काम करणार्या अनेकांना यामुळे प्रवासात अडथळे येतात. त्यामुळे बेस्ट कडून मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेचा विचार करता नवे पॅटर्न डिझाईन करण्याचा विचार करण्यात आला आहे. हा नवा पॅटर्न एप्रिल महिन्यापासून राबवला जाणार आहे. नक्की वाचा: Mumbai: बेस्टकडून सीएनजीवर चालणाऱ्या बसेस पुन्हा सुरू, 'या' कारणामुळे होत्या बंद .
सध्या बेस्टच्या ताफ्यातील 3600 बस रस्त्यावर उतरवल्या जातात. त्यामधून नियमित 35 लाख प्रवासी विक डेज मध्ये प्रवास करत असतात. बेस्टच्या ताफ्यामध्ये आता इलेक्ट्रिक बस, एसी बस आहेत. त्यांंचे दर देखील किफायतशीर आहेत. त्यामुळे पहिल्या 5 किलोमीटरसाठी नॉन एसी 5 रूपये, एसी 6 रूपये इतक्या स्वस्त दरात बस सेवा देत आहे. तसेच तिकीटासाठी डिजिटल पर्यायही देण्यात आले आहेत.
टॅक्सिमॅन युनियनचे सेक्रेटरी AL Quadros, यांच्या माहितीनुसार विक डेजच्या तुलनेत 40% टॅक्सी, रिक्षाच रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी रस्त्यावर असतात. 25 हजार टॅक्सी मुंबईत रोज धावत असतात त्यापैकी 40% सुट्टीच्या दिवशी उपलब्ध असतात. आठवड्यामध्ये एक सुट्टीचा दिवस चालकांनाही आवश्यक असतो असे ते म्हणतात.