मनसे कार्यकर्त्याच्या निधनाचे वृत्त कळताच धनंजय मुंडे यांनी रद्द केली सभा
तेव्हापासून परळी आणि पर्यायाने बीडच्या राजकारणात मुंडे विरुद्ध मुंडे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर हा संघर्ष आता पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा राहिला आहे. राज्याच्या राजकारणात या वादाकडे नेहमीच उत्सुकतेने पाहिले जाते.
Lok Sabha Elections 2019: 'माफ करा, खरं म्हणजे आजच्या जाहीर सभेसाठी तुम्ही इथे मोठ्या संख्येने आला आहात. पण, मी आज येथे भाषण करण्यासाठी आलो नाही. मला काही वेळापीर्वीच कळले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाचा कार्यकर्ता वैजनाथ दहातोंडे (Vaijnath Dahatonde) यांचे काहीच तासांपूर्वी दु:खद निधन झाले. त्याच्या घरावर दु:खाचा डोंगर असताा सभा घेणे योग्य वाटत नाही', असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आयोजित करण्यात आलेलेली जाहीर सभा रद्द केली. त्यांच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांचा काहीसा हिरमोड नक्कीच झाला. मात्र, औचित्य पाहून साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याची चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये बराच काळ रगंली होती. बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha Constituency) असलेल्या परळी (Parli) शहरातील गणेशपार (Ganesh Par) येथे गुरुवारी सांयंकाळी या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
परळी येथील गणेशपार भागाला राजकीयदृष्ट्या मोठे वलय आहे. गेली अनेक वर्षे परळीच्या राजकारणात असे मानले जाते की, गणेशपार भागात सभा जिंकली की, विजयाचा मार्ग सुखकर होतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीने आयोजित केलेल्या या सभेसाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते. त्यासाठी उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून तयारीही अगदी जोमात करण्यात आली होती. आता प्रतिक्षा होती केवळ सभेच्या मंचावरुन धनंजय मुंडे काय बोलणार याकडे.
गोपीनाथ मुंडे हायात असतानाच धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून परळी आणि पर्यायाने बीडच्या राजकारणात मुंडे विरुद्ध मुंडे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर हा संघर्ष आता पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा राहिला आहे. राज्याच्या राजकारणात या वादाकडे नेहमीच उत्सुकतेने पाहिले जाते. कारण, पंकजा आणि धनंजय या बहिण भावात नेहमीच जाहीर सभांतून आरोपप्रत्यारोप होत असता. गणेशपार येथील सभेतून मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांना काय उत्तर मिळते आणि धनंजय मुंडे आता कोणता मोठा आरोप करतात याकडे परळीकरांचे लक्ष लागले असतानाच ही सभाच रद्द करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला. (हेही वाचा, राज ठाकरे विरोधात अर्वाच्च्य भाषेत लिखाण करणार्या विजय वारे यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप)
दरम्यान, वैजनाथ दहातोंडे हा माझा चांगला मित्र होता. आमचे राजकीय पक्ष वेगळे असले तरी, तो अत्यंत तळमळीने काम करणारा कार्यकर्ता होता. सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा कार्यकर्ता अशी त्याची ओळख कायमच राहिल. त्याच्या जाण्यमुळे त्याचे कुटुंबीय अत्यंत दु:खात असताना सभा घेणे मला योग्य वाटत नाही, असे सांगत धनंजय मुंडे यांनी दहातोंडे यांना श्रद्धांजील अर्पण केली.