IPL Auction 2025 Live

बीड जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकासआघाडीचा झेंडा; पंकजा मुंडेंचा पुन्हा पराभव

आणि बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाट यांची निवड झाली असून उपाध्यक्षपद हे बजरंग सोनावणे यांना देण्यात आले आहे.

Dhananjay Munde, Pankaja Munde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Beed Zilla Parishad Election Results: बीड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज (4 जानेवारी रोजी) मतदान झाले. आणि बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाट यांची निवड झाली असून उपाध्यक्षपद हे बजरंग सोनावणे यांना देण्यात आले आहे. आज झालेल्या मतदान प्रक्रियेत, 58 पैकी 32 मतं ही शिवेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महाविकासआघाडीला मिळाली आहेत तर केवळ 21 मतं ही भाजपला मिळाली. एकूण 58 पैकी 5 जण हे मतदानास अपात्र ठरले आहेत.

बीड जिल्हा परिषदेत आता महाविकासआघाडीच्या शिवकन्या सिरसाठ या अध्यक्षपदी विराजमान झाल्या असल्याने, धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, मुंडे कुटुंबियांसाठी बीड जिल्हा परिषद ही नेहमीच प्रतिष्ठेचा विषय राहिली आहे. त्यामुळे ही लढत खऱ्या अर्थाने होती ती पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी. परंतु, मतदान होण्याआधीच भाजपच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांनी पराभव स्वीकारला होता. त्यांनी त्या संदर्भात एक ट्विट देखील केले होते.

बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुक: धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध निकालाआधीच पंकजा मुंडे यांनी स्वीकारला पराभव

‘राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही आहे. रात्रीच, बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत’ असं ट्वीट पंकजा यांनी केलं.

तसेच ऐन निवडणुकीच्या काळात बीडमध्ये असणं महत्त्वाचं असून देखील त्या परदेशी दौऱ्यावर गेल्या आहेत.