Beed Lok Sabha Election 2024: बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर; बजरंग सोनावणे ठरतायत वरचढं, लोकसभा मतदारसंघात कुणाची बाजी?

दोन्ही तगडे उमेदवार असल्याने त्यांच्यात अतीशय टफ फाईट होणार असे मानले जात आहे.

Photo Credit - Facebook

Beed Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुक 2024 साठी भाजपकडून पंकजा मुंडे(Pankja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे(Bajarang Sonavane)यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांना आघाडी मिळणार असल्याचा अंदाज समोर आलेल्या एक्झिटपोलमधून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे या मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

पंकजा मुंडे-

पंकजा मुंडे या भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. त्या भाजपाच्या माजी मंत्री, प्रमुख नेत्या व विद्ममान राष्ट्रीय चिटणीस आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख असून, गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जातं. 2009 मध्ये परळी मतदार संघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा विधानसभेत पोहचल्या होत्या. यानंतर 2014 मध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना-भाजपाचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या. 2014 मध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर 2015 मध्ये चिक्की घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं अनेकदा बोलल्या गेलं मात्र पंकजा मुंडे यांनी आपण भाजपा सोडणार नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं आहे.

बजरंग सोनवणे-

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने बीडमधून बजरंग सोनवणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून सोनवणे यांनी साखर कारखान्यावर काम करत आपला दांडगा जनसंपर्क निर्माण केला. यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. तसेच ते बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. 2019मध्ये त्यांनी प्रीतम मुंडेंना टफ फाईट दिली होती. प्रीतम मुंडे यांना 678,175 तर सोनवणे यांना 5,09,807 मते मिळाली होती. त्यावेळी वंचितच्या उमेदवाराला देखील 92,139 मते मिळाली होती. मात्र यावेळी सोनवणे यांची मोठी ताकद बीडमध्ये असल्याचे बोलले जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif