Beed District Bank Scam Case: बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरण; 169 जणांविरोधात Arrest Warrant, तिघांना अटक
या सर्वांविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. त्यापैकी तिघांना अटक झाल्याचेही समजते. बीड (Beed News) जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरण 2013 मध्ये घडले होते.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँक अपहार (Beed District Central Co-Operative Bank) प्रकरणात 169 जणांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. या सर्वांविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. त्यापैकी तिघांना अटक झाल्याचेही समजते. बीड (Beed News) जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरण 2013 मध्ये घडले होते. या प्रकरणात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. त्यातीलच 169 जणांविरोधात आता अटक वॉरंट निघाले आहे.
पाठिमागील अनेक वर्षे हे प्रकरण न्यायालयात प्रलंबीत आहे. न्यायालयात हजर राहण्यासाठी आरोपींना अेकदा नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपी वारंवार या प्रकरणात तारखेसाठी हजर राहिले नव्हते. त्यामुळे या सर्व आरोपींविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. बीड मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणात अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची नावे आली होती. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजत होते. आता तर अटक वॉरंट निघाल्यानंतर यातील तीन आरोपींना अटक झाली आहे. उर्वरीत आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले असल्याची माहिती आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकेकाळी जवळपास 1100 कोटी ठेवी असलेली बँक म्हणून ओळखली जात असे. दरम्यान, संचालक मंडळावर राजकीय मंडळींचा भरणा अधिक मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून राजकीय लोक, साखर कारखाने, सुत गिरण्या, खासगी उद्योजकांनाही मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करण्यात आले. यातील बहुतांश कर्जवाटप हे बेकायदेशीररित्या होते असा आरोप आणि दावा आहे. काही कर्जदारांनी कर्जफेडही केली आहे. मात्र, तरीही थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. धक्कादायक म्हणजे अनेक संस्था कर्ज डोक्यावर घेऊन बुडीतही निघाल्या आहेत. त्यामुळे आता हे कर्ज वसूल कसे करायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे गैरव्यवहार झाल्याचे लक्षात येताच बँकेवर र शिवानंद टाकसाळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.